मुंबई : सायन परिसरात असणारा मुंबई महानगरपालिकेचा लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सायन रुग्णालयास (Sion Hospital) सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी 'क्लास 1'प्रकारातील 2 अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर (Ventilator) देणगी स्वरुपात नुकतेच दिले आहेत.
मुंबई : सायन परिसरात असणारा मुंबई महानगरपालिकेचा लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सायन रुग्णालयास (Sion Hospital) सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी 'क्लास 1'प्रकारातील 2 अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर (Ventilator) देणगी स्वरुपात नुकतेच दिले आहेत. त्याचबरोबर मॉनिटर्स, सीआर्म ईमेज इन्टेन्सीफायर, इन्फ्युजन पंप इत्यादी सुमारे रुपये पावणे दोन कोटी किमतीची यंत्र सामुग्री देखील बच्चन यांनी देणगी स्वरुपात रुग्णालयास दिली आहे. (An veteran Actor Amitabh Bacchan donate a ventilator to sion hospital)
सदर दोन्ही व्हेंटिलेटर हे सायन रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दोन्ही अत्याधुनिक व्हेंटिलेटरद्वारे गेल्या काही दिवसात सुमारे 30 गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत,अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.
अमिताभ बच्चन यांच्याद्वारे देणगी स्वरुपात प्राप्त झालेले दोन्ही व्हेंटिलेटर हे संगणकीय प्रणाली आधारित अत्याधुनिक व अद्ययावत व्हेंटिलेटर आहेत. या यंत्रांद्वारे ज्या रुग्णांची प्राणवायू (ऑक्सिजन) पातळी खालावलेली आहे, अथवा ज्यांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, अशा रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी या व्हेंटिलेटरचा उपयोग केला जात आहे. या अत्याधुनिक व्हेंटिलेटरचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे गरजू रुग्णांना 100 टक्क्यांपर्यंत प्राणवायू (ऑक्सिजन) देण्याची सुविधा यामध्ये आहे. त्याचबरोबर प्राणवायू दाब आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची सुविधा सदर व्हेंटिलेटरमध्ये असून नळीद्वारे थेट फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधादेखील यात आहे. तसेच नॉन इन्व्हेझिव्ह मास्कपद्धतीने ऑक्सिजन देण्याची सुविधा या व्हेंटिलेटरमध्ये आहे, अशीही माहिती डॉ. जोशी यांनी या निमित्ताने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.