शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवंगत आनंद दिघे यांच्या आनंद मठात पैसे उधळणाऱ्या दोघा पदाधिकाऱ्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी परिपत्रक जारी करताना दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरी-गणपतीची विसर्जन मिरवणूक गुरुवारी आनंद आश्रमात दाखल झाली होती. या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात नाचणाऱ्या लहान मुलांवर शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पैशांची उधळण केली.