मुंबई - बोरीवलीतल्या संजय गांधी नॅशनल पार्क (SGNP) मधील मुख्य आकर्षण असलेला दहा वर्षीय रॉयल बंगाल आनंद वाघाला कर्करोगाचं निदान झाल्याचं समजतंय. इतकंच काय तर त्याची प्रकृतीही गंभीर असल्याचं म्हटलं जातं आहे.
एसजीएनपी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे म्हणाले की, आनंदने जबड्यात एक लप्म झाली आहे. त्याच्या ब्लड टेस्टमधून दिसून आलं आहे की, त्याला वयाबरोबरच मूत्रपिंडाचा तीव्र विकार झाला आहे. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञांच्या आणि वरिष्ठ प्राध्यापकांच्या पथकाने प्राथमिक तपासणी केली आहे. एकत्रित मतांच्या आधारावर, बायोप्सी केली गेली, जिथे त्याला घातक ट्यूमर असल्याचं स्पष्ट झालं. अनुभवी पशुवैद्य आणि प्राध्यापकांची एक टीम त्याच्यावर उपचार करीत आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचा मोठा भाऊ, यशचा गेल्या वर्षी मे महिन्यात याच त्रासामुळे मृत्यू झाला.
डॉ पेठे यांच्यासह एसजीएनपीची बिबट्या बचाव दल सध्या नाशिकमध्ये आहे. मानवी मृत्यू आणि जखमांना जबाबदार असलेल्या बिबट्याला सापळा रचण्यासाठी हे दल नाशिकला गेलं आहे. तर, पशुवैद्य डॉ मनीष पिंगळे सध्या आनंद याची काळजी घेताहेत.
पिंगळे म्हणाले, आजारी असल्यानं आनंदनं रविवारपासून अन्न सोडलं आहे. सध्या तो पूरक आहारांवर आहे. आम्ही त्याच्या आरोग्यावर बारीक नजर ठेवून आहोत आणि शक्य तितके त्याची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
वाघाच्या खालच्या ओठावर दोन (growths)वाढ झाली आहे. बायोप्सीतून असे स्पष्ट झालं आहे की, त्याच्या शरीरात क्रिएटिनिन (Creatinine) ची पातळी वाढत आहे. सध्या रॉयल बंगालचे चार महिला वाघ आहेत आणि आनंद आणि सुलतानसह दोन नर वाघ संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहेत.
anand tiger from detected with cancer he was main attraction of sanjay gandhi national park
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.