जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा.मुंबईची औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) शेजारील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अवतीभवती वसलेल्या श्रमिकांच्या अंधेरी पूर्व मतदारसंघात यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी थेट लढत होऊ घातली आहे. महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान आमदार ऋतुजा लटके, महायुतीतर्फे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मुरजी पटेल यांच्यासह एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत, मात्र प्रत्यक्ष लढत लटके विरुद्ध पटेल, अशीच रंगणार आहे.या मतदारसंघातून शिंदे गटातर्फे माजी चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती इच्छुक होत्या, मात्र भाजपचे जिल्हा महामंत्री पटेल यांना शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने स्वीकृती यांच्यासह शर्मा यांच्या कन्या निकेता यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. अखेर त्यांचे बंड थोपवण्यात शिंदे यांना यश आले.लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघात मोडणाऱ्या अंधेरी पूर्व येथून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर १० हजार ५०० मतांनी आघाडीवर होते. मराठी मतांचा टक्का निर्णायक असूनही या मतदारसंघातून मनसेने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे येथील मराठी मते लटके, पटेल यांच्यामध्ये कशी विभागली जातात, याबाबत उत्सुकता आहे.मशाल चिन्हावर पहिली लढाईउद्धव ठाकरे गटाने मशाल चिन्हावर पहिली निवडणूक या मतदारसंघातून लढवली होती. शिवसेनेचे माजी आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूमुळे २०२२ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात ठाकरे गटाने लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी जाहीर केली. राज्यातील परंपरेनुसार या पोटनिवडणुकीस विरोधी पक्षांनी उमेदवार दिला नव्हता. सहानुभूतीची लाट असल्याने ऋतुजा सहज निवडून आल्या. यंदाच्या लढतीत त्या पुन्हा एकदा मशाल चिन्हावर लढणार आहेत, मात्र त्यांच्यासमोर पटेल यांचे तगडे आव्हान असेल.भाषिक विभागणीया मतदारसंघात सुमारे तीन लाख मतदान आहे. त्यात एक लाखावर मराठी भाषिक आहेत. त्या खालोखाल ६० हजार उत्तर भारतीय, ४० हजार मुस्लिम, ३५ हजार गुजराती, राजस्थानी मतदार आहेत. .प्रमुख समस्यावाहतूक कोंडीऔद्योगिक वसाहत, विमानतळ आणि त्या अनुषंगाने वसलेल्या व्यावसायिक आस्थापनांमुळे या मतदारसंघातील प्रमुख मार्गांवर दिवसाच्या कोणत्याही प्रहरी सर्वप्रकारच्या वाहनांची वाहतूक सुरू असते. मुख्य मार्गांवरून मतदारसंघात ये-जा करणारे मार्ग अपुरे, अरुंद आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे असल्याने येथे कायम वाहतूक कोंडी असते. शिवाय विकास आराखड्यात अनेक रस्ते प्रस्तावित असून ते अद्याप कागदावरच आहेत. रुग्णालयकूपर हे अंधेरी पूर्वेतील नागरिकांना सगळ्यात जवळचे सरकारी रुग्णालय. ते अंधेरी पश्चिमेकडे जुहू भागात आहे. वाहतूक कोंडीतून कूपर रुग्णालय गाठेपर्यंत नागरिकांना दीड ते दोन तासही लागतात. त्यामुळे अंधेरी पूर्वेकडे सुसज्ज रुग्णालय व्हावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पिण्याचे पाणीयेथील अनेक वस्त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशीही मागाणी येथील रहिवासी करत आहेत..विधानसभा लढतीतील चित्र२०१९ - शिवसेनेचे रमेश लटके यांनी ६२ हजार ७७३ मते घेत आपला मतदारसंघ राखला होता. या लढतीत मुरजी पटेल अपक्ष लढले होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ४५ हजार ८०८ मते पडली होती, तर काँग्रेसच्या अमीन कुट्टी यांनी २७ ९५१ मते घेतली होती.२०१४ - या लढतीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यात शिवसेनेच्या रमेश लटके यांनी ५२ हजार ८१७ मते घेत विजय मिळवला होता. त्यांच्या खालोखाल भाजपचे सुनील यादव यांना ४७ हजार ३३८, माजी मंत्री व विद्यमान आमदार सुरेश शेट्टी यांना ३७ हजार ९२९, मनसेचे संदीप दळवी यांना नऊ हजार ४२० मते पडली होती.२००९ - या लढतीत मनसेमुळे मराठी मते मोठ्या प्रमाणात विभाजित झाल्याने काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी यांनी पाच हजार मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला होता. त्यांना ५५ हजार ९९० मते पडली, तर शिवसेनेचे रमेश लटके यांनी ५० हजार ८३८, मनसेचे संदीप दळवी यांनी २५ हजार ५२ मते घेतली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.