Mumbai News : गोखले पुलाचे काम रखडवणार्‍या कंत्राटदाराला होणार दंड; दिरंगाईचा घेणार शोध

अंधेरी येथील गोखले पुलाचे काम रखडल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होते आहे.
Gokhale Bridge Mumbai
Gokhale Bridge MumbaiSakal
Updated on

मुंबई - अंधेरी येथील गोखले पुलाचे काम रखडल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होते आहे. या महिन्यात बसवण्यात येणार्‍या दुसर्‍या गर्डरचा मुहूर्तही लांबणार आहे. त्यामुळे गोखले ब्रीज रखडवणार्‍या कंत्राटदाराला दंड करण्यात येणार आहे.

पुलाची रखडपट्टी, बर्फीवाला पूल जोडण्यातील समस्यांचा शोध संबधित कमिटी घेणार आहे. यात जबाबदार असणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

गोखले पूल पाडण्यात आल्यानंतर येथील वाहनचालकांना गैरसोयींना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे गोखले पूल कधी पूर्ण होणार याची प्रतिक्षा केली जाते आहे. गोखले पुलाच्या कामांत तांत्रिक अडचणी आल्याने गोखले पूल आणि बर्फीवाला पूल दोघांत २.८ मीटरचे अंतर वाढले. त्यामुळे दोन पूल जोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

या प्रकल्पातील चुकांमुळे पालिका प्रशासनाला टिकेला सामोरे जावे लागले. दरम्यान, दोन्ही पूल जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. येत्या जुलैपर्यंत दुसर्‍या गर्डरची बांधणी पूर्ण केली जाणार आहे. तर सप्टेंबरमध्ये हा गर्डर बसवण्याची कार्यवाही पूर्ण होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कामाला वेग -

गोखले ब्रीज १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाचा काही भाग ३ जुलै २०१८ मध्ये कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने ७ नोव्हेंबर २०२२ पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाची एक लेन २६ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली. पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर अंधेरीसह सांताक्रुझ ते जोगेश्वरी आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यास मोठी मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.