Mumbai News : अंधेरी स्थानकाच्या पादचारी पूल आजपासून बंद! प्रवाशांची होणार गैरसोय

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म क्रमांक नंबर ४/५ वर जोडणारा जुना पादचारी पुल आजपासून बंद करण्यात येणार आहे.
andheri railway station
andheri railway stationsakal
Updated on

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म क्रमांक नंबर ४/५ वर जोडणारा जुना पादचारी पुल आजपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील २० दिवस प्रवाशांना इतर पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,अंधेरी स्थानकावरील स्थानक सुधारणा कामासाठी, पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक ४/५ मधील दक्षिणी (जुना) पादचारी पूल १९/२०नोव्हेंबर २०२३ पासून २० दिवसांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या कालावधीत, प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक ६/७ वरील पायऱ्यांचा वापर करू शकतात आणि पूर्वेकडील आणि उन्नत डेकसाठी एस्केलेटर आणि पश्चिमेकडे जाण्यासाठी इतर पादचारी वापरू शकतात. त्यामुळे आता प्रवाशांना प्लॅटफॉर्म ४/५ वर जाण्यासाठी पुढील २० दिवस पायपिट करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.