Mumbai Rain news:अंधेरीच्या सबवेमध्ये मुसळधार पावसामुळे साचलं पाणी, पोलीस सहआयुक्तांनी स्वत: मैदानात उतरुन घेतला आढावा

Mumbai Red alert: अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी, पोलीस प्रशासन वाहतूक कोंडी नियंत्रणात पोलीस सज्ज.
Andheri Subway
Andheri Subway Esakal
Updated on

Mumbai Red Alert:मुंबईत गुरुवारी (दि.२७ जुलै) सकाळपासूनच पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यासाठी वाहतूक पोलीस सह आयुक्त प्रवीण पडवळ हे स्वतः भर पावसात मैदानावर उतरले असून आज त्यांनी मुंबईतील नेहमीच्या वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचाआढावा घेतला.

याशिवाय मुंबईच्या अंधेरी पूर्वे आणि पश्चिमेला जोडणाऱ्या सबवेत पाणी साचल्यामुळे अनेकदा वाहतूक बंद केली जाते या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी च्या परिस्थितीचा आढावा देखील वाहतूक पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी घेतला.

यावेळी या सबवेमधून जाणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन नागरिकांना मदत करत आहे.

मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. बोरिवली स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने, तेथील परिसर जलमय झालाय. बऱ्याच ठिकाणी वाहतूकसेवा ठप्प झाली आहे. कल्याणमध्येही पावसाचा जोर अधिक होता. जोरदार पावसामुळे कल्याण स्टेशनमधील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला. या कोसळणाऱ्या पावसामुळे नाल्यांनी नद्यांचं रुप धारण केले आहे.

Andheri Subway
Mumbai Heavy Rain:मुंबईची तुंबई व्हायला सुरुवात? मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, बोरिवली स्थानक परिसर जलमय

बुधवारी (दि.२६ जुलै) हवामान खात्याने मुंबई आणि उपनगराला रेड अलर्ट दिला होता. यावेळी मुंबईत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येणार आली होती. हवामान खात्याने दर्शवलेली ही शक्यता सत्यात उतरली आहे. मुसळधार पावसाच्या धर्तीवर मुंबईतील शाळांना आधीचं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई आणि नवी मुंबई भागातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन काम करत आहे.

या पावसामुळे लोकल ट्रेन्सचं देखील वेळापत्रक बिघडलंय. गाड्या ३० ते ४० मिनिटं उशीराने धावतं आहे. गुरुवारी संध्याकाळी ५च्या सुमारास गाड्यांना उशीर झाल्याने ठाणे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Andheri Subway
Maharashtra rain:'लोकांना आमदार मतदारसंघात हवा', विधानसभेचं पावसाळी अधिवेशन १५ दिवसांनी घेण्याची भाजप आमदारांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.