Andheri Vidhansabha Election : अंधेरी पश्चिम मतदारसंघात बहुभाषिक आणि आर्थिक दरी स्पष्ट करणाऱ्या दोन टोकांच्या वस्त्या असल्या तरी त्यात राहणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या मात्र सामायिक आहेत. टीचभर झोपडीत राहणाऱ्या श्रमिकाला आणि प्रत्येक चौरस फुटांसाठी लाखभर रुपये खर्चून आलिशान घर घेणाऱ्या श्रीमंतालाही टँकरचे पाणी प्यावे लागते, हे विशेष.
मनसेने उमेदवार न दिल्याने या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप हे पारंपरिक शत्रूपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महायुतीतर्फे भाजपचे विद्यमान आमदार अमित साटम, तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांच्यात लढत होणार आहे.