डोंबिवली - कल्याण आधारवाडी कारागृहात दोन कैद्यांमध्ये झालेल्या वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून एका कैद्यावर ब्लेडच्या पातेने वार करत त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी आधारवाडी कारागृहात ही घटना घडली आहे. याप्रकरणी महिला तुरूंग अधिकारी शोभा मधुकर बाविस्कर यांच्या तक्रारीवरून कैदी युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.