Anil Desai Summoned: शिवसेनेच्या पक्षनिधीतून ५० कोटी काढले? अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स, काय आहे प्रकरण?

Anil Desai Summoned: ठाकरे गटाच्या अडचणीच वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे.
Anil Desai summoned by financial crime branch of Mumbai police
Anil Desai summoned by financial crime branch of Mumbai policeesakal
Updated on

Anil Desai Summoned:

ठाकरे गटाच्या अडचणीच वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केल्यानंतरही उद्धव गटाकडून पक्षनिधी काढल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे.

ईओडब्ल्यूकडे ही तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या प्रकरणात आता कारवाईला वेग आला आहे. अनिल देसाई यांना 5 मार्च रोजी देसाई यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ठाकरे गटाने शिवसेनेच्या पक्षनिधीतून ५० कोटी रुपये काढल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. (Latest Marathi News)

निवडणूक आयोगाने शिंदें गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली, तरी सुद्धा ठाकरे गटाने ५० कोटी रुपयांचा निधी काढला, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

Anil Desai summoned by financial crime branch of Mumbai police
Rahul Gandhi : राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा 'तो' संशयित पोलिसांच्या ताब्यात; नाशिक पोलिस म्हणाले...

शिवसेनेच्या पक्षनिधीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने आरोप करत आहेत. दरम्यान आता अनिल देसाई यांना समन्स आल्याने आगामी काळात पक्षनिधीचा वाद चव्हाट्यावर येणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला फेब्रुवारी २०२३ मध्ये खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. त्यामुळे शिवसेना पक्षनिधीतून पैसा नेमका कधी काढला गेला आणि तो कुणी काढला? याची चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणात संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद रंगणार आहे.

Anil Desai summoned by financial crime branch of Mumbai police
Lok Sabha Election 2024 : ठरलं! लोकसभेसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी आली, मोदी 'या' मतदारसंघातून लढवणार खासदारकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.