...म्हणून लॉकडाऊन काळात हैराण झालेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख

...म्हणून लॉकडाऊन काळात हैराण झालेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख
Updated on

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात घरात कोंडून घ्यावे लागत असल्याने शहरातील मध्यमवर्गीयांना आता गाव खुणावू लागले आहे. त्यासाठी त्यांनी स्थानिक आमदारांवर गृह विभागाचे पत्र मिळवून देण्यासाठी दबाव वाढवत गृह विभाग हैराण झाले आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणत्याही आमदारांच्या दबावाला बळी न पडता अशाप्रकारचे पत्र कोणालाही दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

जगभरामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असतानाही लॉकडाऊनला न जुमानता लोक खरेदीसाठी घराबाहेर पडत होते. आता तर लोकांना गावाकडेही जायचे असून, त्यासाठी कोणालाही गळ घालण्याची त्यांची तयारी असते. मतदारसंघातील लोकांना प्रवासाची पत्रे मिळावीत यासाठी आमदारांच्या ससेमिऱ्याने हैराण झालो असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "सकाळ'शी बोलताना मान्य केले. गावाला जाण्यासाठी परवानगी मागण्यापूर्वी लॉकडाऊन करण्यामागची कारणेही विचारात घेतली पाहिजेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे. शहरामध्ये या साथीचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. या साथीचा एकही रुग्ण गावकडे पोहोचला तर परिस्थिती सांभाळणे कठीण होईल. त्यामुळे आमदारांनीही शिफारस करताना विचार करावा; मात्र गावाला जाण्यासाठी कोणालाही परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

anil deshmuh warns home department not give any travel permission asked by MLAs  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.