Devendra Fadnavis: फडणवीसांना चॅलेंज! "माझ्याविरोधातील व्हिडिओ क्लीप जाहीर करा"; अनिल देशमुखांचं आव्हान

Anil Deshmukh's challenge to Fadnavis! राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या नव्या आरोपांमुळं अडचणीत आले आहेत.
devendra fadnavis anil deshmukh
devendra fadnavis anil deshmukhesakal
Updated on

मुंबई : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या नव्या आरोपांमुळं अडचणीत आले आहेत. या आरोपांनंतर फडणवीस यांनी देखील देशमुख यांच्यावर प्रतिआरोप केले आहेत. पण माझ्याविरोधातील आरोपांबाबतच्या व्हिडिओ क्लीप फडणवीसांनी जाहीर कराव्यात, असं चॅलेंज अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

devendra fadnavis anil deshmukh
Father Francis Dibrito: ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देशमुख म्हणाले, काल फडणवीस यांच्याबाबतीत मी बोललो, त्यावर माझावर दबाव होता असं विधान त्यांनी केलं. पण अनिल देशमुख पुराव्याशिवाय बोलत नाही, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

devendra fadnavis anil deshmukh
ताम्हिणीत ऐतिहासिक महाविक्रमी ५५६ मिलीमीटर पाऊस, 24 तासांत मुळशी धरणांत ३ टीएमसी पाणीसाठा

पण देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दबाव टाकला होता. माझाकडं एक पेन ड्राईव्ह आहे, त्यात सर्व पुरावे आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधातील व्हिडीओ क्लीप जाहीर कराव्यात. वेळ आल्यावर मी हे पेनड्राईव्हमधील पुरावे दाखवेल असही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

devendra fadnavis anil deshmukh
Raj Thackeray on Ajit Pawar: 'लाडकी बहीण' अन् 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर....; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सहीसाठी चार प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आलेले होते, असा दावा श्याम मानव यांनी केला दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन मानव यांचं म्हणणं खरं असून ते चार प्रतिज्ञापत्र फडणवीसांनीच मला पाठवले होते, असं थेट म्हटलं होतं. आपल्यावर दबाव होता आणि प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या नाहीत तर ईडीच्या कारवाईचा धाक दाखवला होता, असा आरोप देशमुख यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.