‘खंडणी वसुलीचे आदेश देशमुखांनी दिले नव्हते’

anil deshmukh
anil deshmukhsakal media
Updated on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांनी कोणत्याही हॉटेल किंवा बारमालकाकडून बेकायदा खंडणी वसुलीचे (extortion case) आदेश दिले नव्हते, अशी माहिती मंगळवारी (ता. ४) पोलीस अधिकारी संजय पाटील (Police sanjay patil) यांनी न्या. चांदीवाल आयोगापुढे दिली. (Anil deshmukh did not give an extortion order says police sanjay patil in court)

anil deshmukh
मुंबईत मिनी lockdown? महापौरांचे संकेत

देशमुख यांच्या वतीने ॲड. गिरीश कुलकर्णी यांनी आज पाटील यांची उलटतपासणी घेतली. पाटील यांना देशमुख यांनी हॉटेलचालकांकडून हप्तावसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप आहे. मात्र, पाटील यांनी त्याचे खंडन केले.

असे कोणतेही आदेश देशमुख यांनी दिले नव्हते, असा जबाब त्यांनी नोंदवला. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणीवसुलीचे आरोप केले आहेत. त्यावर चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची नियुक्ती केली आहे. सीबीआय आणि ईदीदेखील त्याबाबत चौकशी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.