अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

deshmukh-devendra.jpg
deshmukh-devendra.jpg
Updated on

"मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो. निदान या निर्णयानंतर अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे" अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते घाटकोपरमध्ये भाजपा आमदार पराग शाह यांनी उभारलेल्या कोविड आयसोलेशन सेंटरच्या कार्यक्रमात बोलत होते. 

"अनिल देशमुख गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत नसतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर एखाद्या मंत्र्याच्या विरुद्ध न्यायालयााने सीबीआय चौकशी सांगितल्यानंतर त्यांनी त्या पदावर राहण अयोग्य आहे" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

"अनिल देशमुख चौकशीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं. आमची काही हरकत नाही. पण आता त्यांचा राजीनामा घ्या. ही आता राजकीय मागणी राहिलेली नाही. स्वत: उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत" असे फडणवीस म्हणाले.

शरद पवारांच्या भूमिकेसंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारला, त्यावेळी ते म्हणाले की, "मला वाटतं की, पवार साहेबांनी काय भूमिका घ्यावी तो त्यांचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत नैतिकता टिकवण्याची जबाबदारी पक्षाच्या मोठ्या नेत्यावर असते. कोर्टाच्या आदेशामुळे सगळ्यांच्या नजर आता पवार साहेबांकडे लागतील असे फडणवीस यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.