अनिल देशमुख प्रश्नी मुख्यमंत्री मौन? संजय राऊत म्हणाले...

sanjay.jpg
sanjay.jpg
Updated on

मुंबई:  मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचं मत प्रसारमाध्यमांनी जाणून घेतलं. "संपूर्ण निकालाचा अभ्यास करावा लागेल. गृहमंत्री स्वत: कायदा खात संभाळतात. महाविकास आघाडी सरकारतर्फे मत व्यक्त केलं गेलं पाहिजे.  पूर्ण निकाल मी पाहिलेला नाही. मीडियाच्या माहितीवर प्रतिक्रिया देता येणार नाही" असे संजय राऊत यांनी सांगितले. 

"प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. संपूर्ण निकालाचा अभ्यास करावा लागेल जे निकालपत्र आहे त्याचा सरकार अभ्यास करेल. या देशातील कोणतीही तपास यंत्रणा परमेश्वराचा अवतार नाही" असे संजय राऊत म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ या क्षणी कोरोना संकटाशी लढण्यात व्यस्त आहे. कोरोना आजार एक मोठ आव्हान आहे असे राऊत म्हणाले. 

अनिल देशमुख यांच्या विषयावर मुख्यमंत्री मौन का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की,  "मुख्यमंत्री आणि सरकारने वेळोवेळी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष आहे. मुख्यमंत्री शरद पवार, सोनिया गांधी या आघाडीतील घटक पक्षांशी वेळोवेळी चर्चा करत असतात."
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()