Amruta Fadnavis Blackmail Case : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

अनिल जयसिंघानी सात वर्षापासून फरार होता.
Amruta Fadnavis Blackmail Case
Amruta Fadnavis Blackmail Case
Updated on

अखेर बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Anil Jaisinghani arrested from Gujarat devendra fadnavis amruta fadnavis mumbai police)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या सात वर्षापासून जयसिंघानी फरार होते. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. अमृता फडणवीस यांच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिस शोध घेत होते. अखेल गुजरातमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती.

हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांच्यासंदर्भात अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या आहेत.

Amruta Fadnavis Blackmail Case
Anil Jaisinghani : फडणवीसांनी विधानसभेत नाव घेतलं तो अनिल जयसिंघानी आहे तरी कोण? जाणून घ्या प्रकरण

अनिक्षाने आपल्या वडिलांची एका गुन्हेगारी प्रकरणातून सुटका करण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा आरोप आहे.

Amruta Fadnavis Blackmail Case
Aniksha Jaisinghani : अमृता फडणवीसांना धमकावणारी अनिक्षा जयसिंघानी कोण? जाणून घ्या...

अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानी यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध सुरु होता.

Amruta Fadnavis Blackmail Case
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांना लाच आणि ब्लॅकमेलिंग ! उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरण उलगडून सांगितलं

मे २०१९ मध्ये त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. क्रिकेट बेटिंगप्रकरणात अनिल जयसिंघानी यांना अनेकदा अटक करण्यात आलेली आहे.

Amruta Fadnavis Blackmail Case
Amruta Fadnavis Blackmail Case: ब्लॅकमेलिंग प्रकरणी गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट; मविआ नेत्यांची नावं असल्याचा दावा

शिर्डीत जयसिंघानी यांच्या मालकीचे एक हॉटेल आहे. अनिल जयसिंघानी यांनी आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या तिकीटावर चारवेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवल्या आहेत. २०२२ मध्ये जयसिंघानी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकलेही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.