Anjali Damania: अंजली दामानियांचा भुजबळांना इशारा; फर्नांडिस कुटुंबाचे पैसे द्या अन्यथा आम्ही...

छगन भुजबळांनी मुंबईतील फर्नांडिस कुटुंबाचा बंगला लाटल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
chhagan Bhujbal reaction to Anjali Damania  petition in the High Court
chhagan Bhujbal reaction to Anjali Damania petition in the High Court
Updated on

मुंबई : छगन भुजबळांनी मुंबईतील फर्नांडिस कुटुंबाचा बंगला लाटल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच वारंवार या कुटुंबानं भुजबळांशी संपर्क साधला पण त्यांना याचे पैसे मिळाले नाहीत. याबाबत समीर भुजबळ हे पत्रकार परिषद घेऊन खोटं बोलले, असा आरोपही यावेळी दमानिया यांनी केला आहे. (Anjali Damania warning to Chhagan Bhujbal says Pay money to Fernandes family or we will doing aggitation)

chhagan Bhujbal reaction to Anjali Damania  petition in the High Court
Manoj Jarange: "...तर लायकी नसलेल्याच्या हाताखाली कामाची वेळ आली नसती"; खराडीतल्या सभेत जरांगेंचं विधान

दमानिया म्हणाल्या, "फर्नांडिस कुटुंबानं त्यांचं घर रहेजा बिल्डरला डेव्हलपमेंटसाठी दिलं होतं. पण रहेजानं ते समीर भुजबळ यांना दिलं आणि तिकडं आता टोलेजंग इमारत उभी आहे, ते लाटलेलं घर आहे. समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, सन २००३ साली आम्ही ते घेतलं आणि आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला.

chhagan Bhujbal reaction to Anjali Damania  petition in the High Court
Shraddha Walkar : "...याची मला आता खंत वाटते", श्रद्धा वालकरच्या वडिलांचं भाष्य; हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण

ईडीचाही उपयोग होत नाही

पण फर्नांडिस कुटुंबाचा जो बंगला होता तो त्यांच्या आई-वडिलांच्या नावावर होता, तो भुजबळांनी लाटला. या बदल्यात त्यांना एक रूपयाही मिळाला नाही. त्यांना पैसे द्यायला तुम्ही कधी तयार होतात? तुम्हांला ती जागा हडप करायची होती, यासाठी तुम्ही वाट बघत राहिलात, असा आरोपही त्यांनी केला.

तसेच मी या प्रकरणात तडमडयाला आलेले नाही. तर मला या कुटुंबानं आम्हाला मदत करा अशी विनंती केल्यानं त्यांच्यावतीनं मी बोलते आहे. तुमच्यासारखे लोकं कोणत्याही पक्षात जातात भ्रष्टाचार करतात, त्यांच्याविरोधात ईडी लागते पण कारवाई होत नाही. तुम्ही अजित पवार, तटकरे सर्व सारखेच आहात, अशा शब्दांत दमानिया यांनी समीर भुजबळांवर हल्लाबोल केला.

chhagan Bhujbal reaction to Anjali Damania  petition in the High Court
Amitabh Bachchan: "तुमच्या प्रतिभेचं, कर्तुत्वाचं प्रतिबिंब..."; फायनलमधील पराभवानंतर महानायकाचं ट्वीट चर्चेत

समीर भुजबळ खोटे बोलताहेत

या प्रकरणावर समीर भुजबळ काय वाट्टेल ती उत्तरं देत आहेत. त्यांनी सांगितलं की, ते या कुटुंबाला साडे आठ कोटी रुपये देणार होते. पण ते कसे देणार होते त्याचा आज खुलासा करुया. सुप्रिया सुळेंना याबाबत प्रश्न विचारा.

वाय बी चव्हाण सेंटर इथं किती बैठका झाल्या? सह्या नसताना हा व्यवहार रजिस्टर कसा झाला. कोणत्या रजिस्ट्रारनं हे केलं? तुम्ही राजकारणी आहात म्हणून केलं का? असे अनेक सवालही त्यांनी भुजबळांना विचारले आहेत.

chhagan Bhujbal reaction to Anjali Damania  petition in the High Court
World Cup 2023: बालिश! फायनलसाठी कपिल देव यांना निमंत्रण न दिल्यानं काँग्रेसचा BCCIवर हल्लाबोल

आम्ही रस्त्यावर उपोषणाला बसणार

फर्नांडिस कुटुंबाला पैसे दिले नाही मग तुम्ही तिकडे बिल्डिंग कशी बांधली? नरोना कोण आहे त्याला पैसे दिले असं तुम्ही सांगितलं. कोण तो नरोना? तिसऱ्या माणसाला पैसे दिलेत तर तुमचा मूर्खपणा आहे. १०० वेळा हा परिवार तुम्हाला भेटला आहे.

पण तुम्ही त्यांना पैसे दिले नाहीत. आता आम्ही दोन गोष्टी करणार आहोत. पण आता आम्ही पोलिसांची परवानगी घेणार आणि या कुटुंबासोबत तिकडे रस्त्यावर उपोषणाला बसणार आहोत, अशा इशारा यावेळी दमानिया यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.