विरार : वसई पूर्वेतील रस्त्यासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने, उपोषणे केली परंतु त्यांच्या प्रयत्नाला अजून यश आलेले नाही. चिंचोटी-अंजुरफाटा या रस्त्याला सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने अक्षरश: वाळीत टाकल्याने यंदाही पावसाळ्यात सर्वसामान्य वाहतुकदार व नागरिकांना जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे.
या रस्त्यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली, तक्रारी केल्या. मात्र पीडब्ल्यूडी प्रशासन व रस्ते देखभाल दुरूस्तीसाठी नेमलेल्या कंपनीने काणाडोळा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनमत प्रक्षुब्ध झाले आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले असले तरी काम मात्र अजूनही सुरु झाले नसल्याने नागरिकांता रस्त्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत.
तर दुसऱ्या बाजूला लोकपप्रतिनिधी म्हणून आपणही रस्त्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगून वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ताठ पालघरचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या रस्त्यावरून फरफटका माररण्याचे आव्हान केले आहे.
अंजुरफाटा ते चिंचोटी हा रस्ता दुरूस्त व्हावा यासाठी या भागातील नागरिकांनी अनेक आंदोलने झाली, तसेच उपोषणही केले होते. त्याच प्रमाणे या रस्त्यावरील टोलनाका ही बंद पाडला होता. दरम्यानच्या काळात रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे अनेक अपघात होऊन त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. तर काही जण अपंग झाले आहेत. उन्हाळ्यात तर खड्ड्यातील उडणाऱ्या धुळीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होत होता. असे असतानाही गेल्या १० वर्षात या रत्स्याकडे शासनाचे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी हा प्रश्न थेट न्यायालयात नेण्याची तयारी सुरु केली आहे.
पावसातच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे पाण्याने भरून राहिल्याने वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागतात. दरम्यान, पालघर लोकसभा निवडणुकीदरम्यान ग्रामस्थांनी मतदानावर जाहीर बहीष्कार टाकण्याचा इशारा सरकारला दिल्यानंतर नायगाव पोलिसांनी ग्रामस्थ व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची बैठक घेत समन्वय साधला होता.
यावेळीदेखील पीडब्ल्यूडी प्रशासनाने सदर रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता करण्यात अद्याप पीडब्ल्यूडी प्रशासनाला यश आलेले नसल्याने नागरिकांच्या संतापाचा भडका पुन्हा उडू शकतो असे बोलले जात आहे. पावसाळा सुरु झाल्याने रस्त्यावरील खड्डे अजून मोठे होत जाणार असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणत प्रवास करताना त्रास होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
गेली कित्येक वर्ष आम्ही या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहोत. रस्त्यासाठी रस्ता रोको,आमरण उपोषण असे सर्व मार्ग अवलंबुन झाले परंतु रस्ता काही होत नाही . रस्त्यावरील अपघाताचीसंख्या वाढत असून त्यात अनेक जणांचे जीव गेले आहेत तर कित्येक जण अपंग झाले आहेत. याची शासन दखल घेत नसल्याने अखेर आम्ही याबाबत न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरु केली आहे.
-दिनेश म्हात्रे, माजी सरपंच , कामण
या रस्त्यासाठी बहुजन विकास आघाडी आणि मी स्वतः सातत्याने पाठपुरावा करत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री हे जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत त्यांनी एकदा या भागाचा दौरा करून रस्त्याची पाहणी करावी . म्हणजे त्यांना येथील नागरिकांच्या समस्यांची जण होईल.
हितेंद्र ठाकूर , आमदार , वसई
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.