मुंबई विद्यापीठाच्या 'वगनाट्य : रुप आणि आविष्कार' राष्ट्रीय कार्यक्रमाची सांगता

annabhau-sathe
annabhau-sathesakal media
Updated on

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau sathe) यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त (birth date) मुंबई विद्यापीठात (Mumbai university) आयोजित करण्यात आलेल्या 'वगनाट्य : रुप आणि आविष्कार' या राष्ट्रीय चर्चा सत्राचा (national discussion) समारोप नुकताच झाला.

मुंबई विद्यापीठ, अण्णा भाऊ साठे अध्यासन, लोककला अकादमी, आणि युगदक्ष वाङमय परिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसाच्या या चर्चासत्राचे तमाशा कलावंत आतंबर शिरढोणकर, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. डॉ. बी.एस. वाघमारे यांच्या हस्ते उद्घाटनपर झाले. तर बीजभाषण हे ज्येष्ठ अभ्यासक रवींद्र गोळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर हे भूषवले. विद्यापीठाचे कुलसचिव व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. बळीराम गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि भूमिका मांडली.

annabhau-sathe
एका लसीच्या डोस साठी नालासोपाऱ्यात रात्रभर नागरिकांचे जागरण

दोन दिवसांच्या चर्चासत्रात समारोपासह एकुण पाच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. असून यात डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. गणेश चंदनशीवे, डॉ. आनंद बल्लाळ, डॉ. मांतेश हिरेमठ, डॉ. राजेश खरात, डॉ. प्रदीप शिंदे, डॉ. सीमा मुसळे, डॉ. शिवाजी वाघमारे, डॉ.नरेंद्र पाठक, डॉ. कैलास महाले, डॉ. सुनिता रोकडे, डॉ. धनंजय होनमाने, डॉ. विठ्ठल रोटे आदी आपले विचार मांडले. समारोपाच्या सत्रात मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी पारंपारिक तमाशाचे लोकनाट्य असे नामकरण करून तमाशाला प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.