Mumbai Crime News: 3 पोलीस अधिकाऱ्यांनी मागितली लाच; गुन्हा दाखल!

Mumbai Bribe Crime: All three have been charged under the Prevention of Corruption Act and further investigation is underway
Mumbai Crime News
Mumbai Crime Newssakal
Updated on

Mumbai Crime News: पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोरिवली येथील एका महीलेकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी 3 पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.तिघांनाही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत आरोप असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Mumbai Crime News
Sakal Publication : ‘सकाळ प्रकाशन’तर्फे भव्य वाचक महोत्सव ; वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उपक्रम, सवलतीच्या दरांत पुस्तके उपलब्ध

या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना बोरिवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या तिघांपैकी एक सुधीर कालेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. पोलीस निरीक्षक अरविंद घाग आणि पोलीस उप निरीक्षक स्वप्नाली मांडे हे अन्य 2 पोलीस अधिकारी आरोपी आहेत.

Mumbai Crime News
Mumbai Temperature: मुंबईकरांनो सावधान! उष्णतेपासून वाचण्यासाठी 'हा' सरकारला वेक अप कॉल, नाहीतर...

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासरच्याकडून स्त्रीधन परत मिळवून द्यायच्या आश्वासन देत आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेकडे 5 लाखांच्या लाचेची मागणी केली. महिलेने पोलीस अधिकाऱ्याला 2 लाख रुपये दिले. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयात तक्रार दखल केली. न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायलयाने आरोपी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्या प्रमाणे न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime News
Mumbai Crime: दारुच्या नशेत 'त्याने' तिची केली हत्या; प्रेताचीही लावली विल्हवाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.