मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकानं नष्ट केले 14 कोटींचे अमली पदार्थ

3000 किलो गांजा तर 84 किलो अँफेटामाईनचा समावेश
मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकानं नष्ट केले 14 कोटींचे अमली पदार्थ
Updated on

मुंबई : मुंबई पोलिसांच्या (mumbai police) अंमली पदार्थ विरोधी पथकानं 3090 किलो अंमली पदार्थ जाळून नष्ट केले आहेत, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 14 कोटींपेक्षा जास्त आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सतत जप्त करत असतं. या अंमली पदार्थंचं नक्की काय केलं जातं हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर, जे अंमली पदार्थ जप्त करण्यात येतात, ते केसमध्ये गरज असेपर्यंत एकत्रीत साठवले जातात, त्यानंतर साठवलेले अंमली पदार्थ हे पोलिस आयुक्तांच्या परवानगीनं, ड्रग(DRUG) डिस्पोजल कमिटीच्या समक्ष जाळून नष्ट करण्यात येतात.

ही अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रीया आहे. त्यानुसार मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे(hemnat nagrale) यांच्या परवानगीनं, ड्रग डिस्पोल कमिटीचे अध्यक्ष पोलिस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील(vishwas nanagre patil), कमिटीचे सदस्य अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) विरेश प्रभ(viresh prabh), पोलिस आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी पथक) यांच्या समोर तळोजाच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमी. या ठिकाणी एका बंदिस्त भट्टीत हे अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले.

या 3090 किलो अंमली पदार्थांमध्ये 3000 किलोपेक्षा जास्त गांजा, 84 किलो अँफेटामाईन, 159 ग्रॅम हेरॉइन, 3 किलो चरस आणि 24 ग्रॅम कोकेनचा समावेश आहे. याआधीही फेब्रुवारी 2021 मध्ये 670 किलो अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.