मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील (आयडॉल) मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. ही प्रवेश परीक्षा 25 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन स्वरूपात होणार आहे.
आयडॉलमध्ये 2005 पासून एमसीए अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तीन वर्ष कालावधीचा व सहा सत्र असलेला हा अभ्यासक्रम आहे. या वर्षीपासून आयडॉलमध्ये प्रथमच एमसीए हा अभ्यासक्रम सीबीसीएस पद्धतीने सुरु होत आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील अनेक महाविद्यालयात अध्ययन केंद्रे आहेत. यामध्ये प्रात्यक्षिक घेतले जातात.
दरवर्षी नोकरी करणारे 400 ते 500 विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. या अभ्यासक्रमात बारावी किंवा पदवी अभ्यासक्रमात गणित हा विषय असलेले सर्व शाखेतील पदवीधर विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यानी अंतिम वर्षाची परीक्षा दिली असेल व त्यांचा निकाल प्रलंबित असेल या विद्यार्थ्यांनाही ही प्रवेश परीक्षा देता येईल.
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज http://idolmca.digitaluniversity.ac/#/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही प्रवेश परीक्षा 25 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असेल. विद्यार्थ्यांना मोबाईल किंवा लॅपटॉपवरून प्रवेश परीक्षा देता येईल. या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व आयडॉलच्या लिंकवर उपलब्ध आहे.
---------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Applications for Idol MCA entrance exam start online exam on November 25
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.