मुंबई : मराठी भाषेला अभिषात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाला त्वरीत मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाकडे पडून आहे. (approve pending proposal for Marathi classic language CM Eknath Shinde requisted to PM Modi)
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक महत्वाच्या विषयांवर सभागृहाच चर्चा झाली तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी,अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली.
केंद्रानं राज्यसभेत दिलं होतं आश्वासनं
मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात यासंदर्भातील सविस्तर अहवाल केंद्राकडं पाठवण्यात आला होता. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्र सरकारनं गुरुवारी राज्यसभेत माहिती दिली होती. यासंदर्भात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. चतुर्वेदी यांनी केंद्राला विचारलं होतं की, महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी आणि स्वतः राज्य सरकारनं वारंवार केंद्रापुढं मांडल्यानतंरही मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा का मिळालेला नाही? यावर विचारविनिमय सुरु असल्याचं उत्तर कायम केंद्राकडून देण्यात येतं पण अद्याप ते का झालेल नाही?
चतुर्वेदी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय सांस्कृतीक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी उत्तर देताना सांगितलं होतं की, "लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यावर सध्या आंतर मंत्रालयीन विचारविनिमिय सुरु आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय समोर येईल. केंद्राकडून सध्या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे"
किती भाषांना अभिजात दर्जा? काय आहेत निकष?
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं नुकतंच सांस्कृतीक मंत्रालयाकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला आहे. देशात सध्या तामिळ, तेलूगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना सध्या अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रानं जे निकष लावले आहेत. त्यानुसार, संबंधित भाषेला १,५०० ते २,००० वर्षांचा नोंदणीकृत इतिहास असावा. प्राचिन काळात संबंधित भाषेतील साहित्याबाबत पुरावे असावेत. तसेच संबंधित भाषेत मूळ साहित्यिक परंपरा असावी ती इतर बोली भाषेतून आलेली नसावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.