Mumbai News : जैवविविधता टिकवण्यासाठी मुंबईत कृत्रिम खडकांचा प्रयोग

कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत प्रायोगिक प्रकल्पाला सुरूवात
artificial rocks  experiment in Mumbai preserve biodiversity Coastal Road Project
artificial rocks experiment in Mumbai preserve biodiversity Coastal Road Projectesakal
Updated on

मुंबई : मुंबईत कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे बाधित होणारी जैवविविधता कायम ठेवण्यासाठी एक प्रयोग करण्यात येत आहे. त्यामुळे कोस्टल रोडच्या प्रकल्पाच्या भागात पुन्हा एकदा ही जैवविविधता कायम राहण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळतानाच ही जैवविविधता टिकवण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत मॅगग्रुव्ह फाऊंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिओनोग्राफीच्या माध्यमातून कृत्रिम खडकांच्या (आर्टिफिशिअल कोरल रिफ) प्रकल्पाचा श्रीगणेशा झाला आहे.

नॅशनल इंस्टिट्युट ऑफ ओशिओनोग्राफी सध्या कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत एका प्रायोगिक प्रकल्पावर काम करत आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या निमित्ताने भराव घालण्यात आलेल्या ठिकाणी आणि सी वॉलच्या जागेत कृत्रिम खडकांची निर्मिती केली जात आहे.

या खडकांची देखरेखही संस्थेकडून करण्यात येणार आहे. या प्रायोगिक प्रकल्पाच्या निमित्ताने जैवविविधतेली वाढ आणि नव्याने पडणारी भर अभ्यासण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम खडकांची उपयुक्तताही यानिमित्ताने तुलनात्मक पद्धतीने अभ्यासण्यात येणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत जैवविविधतेवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठीच हा प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत मॅनग्रुव्ह फाऊंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिओनोग्राफी (एनआयओ) च्या मदतीने काम हाती घेण्यात आले आहे.

प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत मॅनग्रुव्ह फाऊंडेशनने करारान्वये ८८ लाखांपैकी ५२ लाख रूपयांचा खर्च एनआयओला दिला आहे. या प्रकल्पाअंतर्गत कोस्टल रोडच्या सी वॉलच्या जागेत हे कृत्रिम खडक तयार करण्यात येणार आहेत.

प्रकल्पाअंतर्गत सहा काही गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अंतर आणि जैवविविधतेचे वैशिष्ट्य, लाटांचा वेग आणि एक्स्पोजर, नजीकची खाडी तसेच ओहोटीची ठिकाणे आदींचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

पर्यावरण मंत्रालयाने कोस्टल रोड प्रकल्पाला मंजुरी देतानाच या प्रकल्पाच्या २ टक्के निधी हा कांदळवन कक्षाला देण्याची अट घातली होती. त्यानुसार कांदळवन कक्षाला १७५ कोटी रूपये देण्यात आले आहेत. या रमकेपोटी मिळणाऱ्या व्याजातूनच प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

एनआयओ आणि मॅनग्रोव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून एक विशेष सी वॉलही तयार करण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी जैवविविधता विकसित झाल्यास त्यांच्या वाढीसाठी पुरक वातावरण निर्माण करणे हे दोन्ही संस्थांपुढील आव्हान असेल.

या प्रकल्पाअंतर्गत प्रवाळांचे स्थलांतरण वरळी समुद्र किनाऱ्यापासून ते कुलाबा असे करण्यात आले होते. या स्थलांतरणाच्या प्रकल्पाअंतर्गत हलवण्यात आलेली प्रवाळे ही अतिशय चांगल्या स्थितीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

एनआयओ आणि वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडून प्रवाळांसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. हाजी अली परिसरातून कुलाबा येथील नेव्ही नगर येथे प्रवाळ स्थलांतरीत करण्यात आले.

प्रवाळांच्या ३२९ जिवंत कोरल प्रजातीपैकी ३०३ प्रजाती (९२ टक्के) सुदृढ आढळल्या आहेत. प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत प्रियदर्शनी येथे एक, वरळीत दोन, हाजी अली येथे दोन ब्लॉक सी वॉल तयार करण्यात येणार आहेत.

कृत्रिम खडक कशासाठी ?

प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत सध्या वरळी येथे कामाला सुरूवात झाली आहे. कृत्रिम खडकांचे आकारमान पाहता हे ठेवण्यासाठी मोठ्या आकाराच्या क्रेनची गरज आहे. त्यामुळे डिझाईननुसार या क्रेनच्या माध्यमातून हे कृत्रिम खडक याठिकाणी ठेवण्यात येत आहेत. सध्या वरळीत या कामाच्या निमित्ताने कृत्रिम खडकांची रचना करून एनआयओ याचे निरीक्षण करणार आहे.

त्यामुळे जैवविविधता याठिकाणी आकर्षिक होण्यासाठीची ही रचना किती यशस्वी होते, हे येत्या दिवसांमध्ये याठिकाणी आढळणाऱ्या जलचर आणि जैवविविधतेच्या माध्यमातूनच स्पष्ट होईल. सध्या वरळीत ओहोटीच्या काळात हे कृत्रिम खडक बसवण्यात येत आहेत. आगामी काळात इतर निवडलेल्या ठिकाणीही अशा स्वरूपाचे काम अपेक्षित आहे, अशी माहिती मॅनग्रुव्ह फाऊंडेशनचे संशोधन मानस मांजरेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.