मुंबई हायकोर्टाने कॉर्डिलीया क्रूज ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याविरोधात एनसीबीने दोषारोप केल्याप्रमाणे 'क्वचितच कोणताही सकारात्मक पुरावा' आढळून येत असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यांच्याविरोधात दावा करण्यात आल्याप्रमाणे कसलाही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचं हायकोर्टाने म्हटलंय. कोर्टाने दिलेल्या 14 पानी सविस्तर आदेशामध्ये काय म्हटलंय? हेच जाणून घेऊयात...
आर्यनकडून कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज जप्त केले गेले नाहीत आणि एनसीबीकडून दावा करण्यात आल्याप्रमाणे मर्चंट आणि धमेचा यांच्याकडून अल्प प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. एनसीबीच्या दाव्यानुसार, ज्यांच्याकडे ड्रग्ज सापडले होते त्यांच्यासह सर्व आरोपी हे गुन्ह्यातील “षड्यंत्रात सामील” होते. मात्र, या तिघांनी यासंदर्भात कट रचला होता किंवा या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींसोबत हातमिळवणी झाली होती, असे अनुमान काढण्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाला पटवून देण्यासाठी रेकॉर्डवर क्वचितच कोणताही सकारात्मक पुरावा उपलब्ध आहे. यातील सर्व आरोपींनी सारख्या हेतूने बेकायदेशीर कृत्ये करण्यास सहमती दर्शविली असल्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाहीये.
पुढे कोर्टाने म्हटलंय की, याउलट या तारखेपर्यंत केलेल्या तपासातून असं दिसून येतं की आर्यन आणि मर्चंट हे धमेचापासून स्वतंत्ररित्या प्रवास करत होते. आणि वरील मुद्द्यावर त्यांची कसली बैठक झाली नसल्याचं दिसून येतं आहे.
आरोपी कमर्शियल प्रमाणातील ड्रग्ज सेवनाच्या गुन्ह्यात गुंतलेले आहेत का, याचा अंदाज लावणे देखील या टप्प्यावर कठीण असल्याचं कोर्टाने म्हटले आहे.
आरोपी केवळ क्रूजवर प्रवास करत होते म्हणून त्यांच्याविरुद्ध कलम 29 (षड्यंत्र) ची गुन्हा दाखल करणे योग्य ठरणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
आर्यनच्या फोनमधील व्हॉट्सअॅप चॅट्सच्या आधारे एनसीबीन केलेल्या दाव्यावर न्यायालयाने म्हटलंय की, हा कट सिद्ध करण्यासाठी काहीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही.
आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिल्याच्या एनसीबीच्या दाव्यावर, कोर्टाने म्हटलंय की, हे कबुलीजबाबचे विधान आहे जे पुरावा म्हणून स्वीकार्य धरले जाऊ शकत नाही.
जरी त्यांच्यावरील ड्रग्ज सेवनाचे आरोप खरे मानले तरी त्यांना जास्तीतजास्त एका वर्षापेक्षा अधिक शिक्षा करता येणार नाही.
यातील आरोपींना आधीच जवळपास 25 दिवस तुरुंगवास भोगावा लागला आहे. संबंधित वेळी त्यांनी ड्रग्ज सेवन केले होते की नाही हे ठरवण्यासाठी अर्जदारांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.