मुंबई : मुंबईत अलीकडच्या काही वर्षात वायू प्रदूषणाची (Air pollution) समस्या जटील होत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावरदेखील (Health update) मोठा परिणाम होत आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जातात. वायू प्रदूषणाची कारणे, स्त्रोत, त्यावरील उपाययोजना याबाबत माहिती देण्यासाठी ‘असर’ या संस्थेने (Asar organization) पाच लघुपटांची निर्मिती केली आहे.
हवा प्रदूषणाबाबत माहिती देणाऱ्या पाच लघुपटांमध्ये कांचन, सायरा आणि राघव ही तीन शाळकरी पात्रे वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगत आहेत.‘असर’ने इंडियन क्लायमेट कोलॅबरेटिव्हच्या (आयसीसी) मदतीने तयार केलेले हे लघूपट इंग्रजी-हिंदी, इंग्रजी- मराठी, इंग्रजी-पंजाबी अशा तीन भाषांमध्ये तयार करण्यात आल्या असून इतर भाषांमध्येही डबिंगचे काम सुरू असल्याचे ‘असर’कडून सांगण्यात आले.
शहरातील हवेची गुणवत्ता खराब झाली, म्हणजे हा नेमकं काय होत याबाबत सर्वसामान्यांना माहिती उपलब्ध होत नाही. त्यातील अनेक बाबी तांत्रिक असतात. त्यासाठी विशेष संज्ञा आणि शब्द वापरले जातात. या सर्व अडचणी दूर करुन सोप्या शब्दात नागरिकांना या व्हिडिओद्वारे माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती असरचे संचालक ब्रिकेश सिंह यांनी दिली.
वायू प्रदूषणाबाबत लघूपटाच्या माध्यमातून माहिती देण्याचा उपक्रम चांगला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल. परिणामी भविष्यात लहान मुलांनाही त्याचा फायदा होईल.
- अशोक शिनगारे, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.
लहान मुलांमध्ये श्वसनांसंबंधीचे तीव्र आणि जुनाट आजारांचे कारण हे वायू प्रदूषण आहे. त्यामुळे केवळ श्वसनविकारच नव्हे, तर हृदयविकार, पक्षघात, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे वायू प्रदूषणाच्या धोक्याची जाणीव होण्यासाठी हे लघूपट नक्कीच उपयोगी ठरतील.
- डॉ. सलील बेंद्रे, वैद्यकीय सल्लागार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.