"उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त"; आशिष शेलार यांची टीका

ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भाजपने टिकवला होता. स्वार्थासाठी आणि स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाकरिता, खुर्चीसाठी लोलुपता केवढी होती हे उद्धव ठाकरे यांनी आज दाखवले आहे, अशीही टीका शेलार यांनी केली.
"उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त"; आशिष शेलार यांची टीका
Updated on

मुंबई: राम मंदिरासाठी कोठारी बंधूंनी गोळ्या झेलल्या. मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने त्यांचा खून केला. त्याच  समाजवादी पक्षासोबत उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी केली. त्यामुळे त्यांच्याही हाताला रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचे रक्त लागले आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

निवडणुकांची तयारी

भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय कार्यक्रम चालू आहे. तीन लोकसभांसाठी एक नेता या प्रमाणे देशभर प्रवासाचा कार्यक्रम ठरला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सर्वजण देशातील तीन ते चार लोकसभेचे एक क्लस्टर बनवून बैठका घेणार आहेत. (Latest Marathi News)

त्या अगोदर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रत्येक लोकसभेच्या तीन विधानसभा यांच्या बैठका घेणार आहेत. त्याचा दौरा आता सुरू झाला आहे. जे विधानसभेतील प्रत्यक्ष निवडणुकीचे काम पाहणार आहेत या सुपर वॉरिअरची मुंबईतील बैठक घेतली जाणार आहे. संघटनेच्या तळागाळातील स्तरावर पोहोचणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे. याच अनुषंगाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे,अशी माहिती शेलार यांनी दिली.

"उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त"; आशिष शेलार यांची टीका
Manoj Jarange: "सरसकट आरक्षण द्या अन्यथा रक्ताचे नातेवाईक कोण हे स्पष्ट करा"; जरांगेंचा उपसमितीच्या बैठकीत सवाल

उबाठाच्या दिल्ली दौऱ्याबद्दल बोलताना शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे आमच्याबरोबर असताना आमच्याकडे या, बंगल्यावर या, अश्या पद्धतीचा अहंकार दाखवणारे आता सरपटत दिल्लीला चालले आहेत. ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भारतीय जनता पक्षाने टिकवला होता. स्वार्थासाठी आणि स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाकरिता, खुर्चीसाठी लोलुपता केवढी होती हे उद्धव ठाकरे यांनी आज दाखवले आहे अशीही टीका शेलार यांनी केली.

"उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचे रक्त"; आशिष शेलार यांची टीका
Adani-Hindenberg: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणार का? सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणार फैसला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.