डोंबिवली - उन्हाळा, पावसाळा असो सण उत्सव असो डोंबिवलीकर आवाज उठवून उठवून शांत झाले पण रस्त्यांवरील खड्डे काही बुजले नाही. मात्र विधानसभा निवडणूका लागताच अनेक रस्त्यांची कामे एमएमआरडीएने हाती घेत पूर्ण केली. उर्वरित रस्त्यांची अवस्था कधी सुधारणार यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष करू शकतात हे समजताच मुख्य रस्ते डांबर टाकून गुळगुळीत करत मतदारांचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र आज ही अनेक भागातील रस्त्यांची चाळण तशीच असून येथील मतदारांशी दुजाभाव का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.