Raj Thackeray: विधानसभेसाठी राज ठाकरेंची महायुतीकडे 20 जागांची मागणी? मतदारसंघ ठरले, संभाव्य उमेदवार कोण?

Assembly Election Maharashtra : लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला नंतर राज ठाकरे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली. विधानसभेला राज ठाकरे मोठ्या प्रमाणात उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal

Assembly Election Maharashtra

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. यापूर्वी अनेक बैठका राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये झाला. राज ठाकरे दिल्लीत देखील गेले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली होती. दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची १३ जून रोजी महत्वाची बैठक आहे. त्याचप्रमाणे कार्यकारणी निवडणूक देखील याच दिवशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला नंतर राज ठाकरे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली. विधानसभेला राज ठाकरे मोठ्या प्रमाणात उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.

राज ठाकरे विधानसभेसाठी महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील २० जागांची मागणी करत असल्याची माहिती आहे. साम टिव्हीने याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईतील मराठमोळे परिसर असलेले दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे या जागांची मनसे चाचपणी करत आहे.

Raj Thackeray
Dombivli MIDC Blast : ''डोंबिवलीत आग पण जबाबदार यंत्रणा'', भाजप नेत्याने जबाबदारी झटकली; म्हणाले...

चार दिवसापूर्वी  राज ठाकरे यांची महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक झाली. काही महत्त्वाच्या नेत्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा देखील करण्यात आली. विधानसभेसाठी मनसेचे काही संभाव्य इच्छुक उमेदवारांची यादी देखील जाहीर झाली आहे.

  • दादर परिसरातून माजी आमदार नितीन सरदेसाई

  • वर्सोवा परिसरातून मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे

  • वरळी या मतदार संघातून संदीप देशपांडे

  • शिवडी / नाशिक परिसरातून बाळानांदगावकर

Raj Thackeray
Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com