नवी डोकेदुखी; राज्यात कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्याच रुग्णांची संख्या आहे...

नवी डोकेदुखी; राज्यात कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्याच रुग्णांची संख्या आहे...
Updated on

मुंबई, ता. 21 : कोविड विषाणुची बाधा झाल्याची कोणतीही लक्षण न दिसणाऱ्या रुग्णांची संखा वाढत आहे. आतापर्यंत कोविड पॉझिटिव्ह ठरलेल्या 70 टक्के रुग्णांमध्ये या आजाराबाबत कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र कोविड चाचणीत हे रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अश्या रुग्णांना शोधून काढणे हे प्रशासना पुढे आव्हान ठरले आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 76,092 नमुन्यांपैकी 71,611 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 4666 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील 2336 रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी 1890 ( 81%) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर 393 रुग्णांना ( 17 %) रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी केवळ 53 रुग्ण ( 2 %) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत. 

कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर साधारण 5-6 दिवसात ताप येतो.तसेच सर्दी खोकला ही लक्षणही दिसतात.जास्तीत जास्त 15 दिवसाच्या काळात हि लक्षणे दिसू शकतात.मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते त्यांच्यात अशी लक्षणं ही दिसून येत नाही. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी केली असता कोणतीही लक्षणं दिसत नसतानाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे उघड झाले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यात येत असल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी दिली.

एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यावर त्या व्यक्तीच्या सहवासितांसह संपर्कातील प्रत्येकाची तपासणी करण्यात येत आहे.त्यामुळे कोणतीही लक्षणं नसलेली रुग्णही आढळू लागली आहेत. यामध्ये तरुण आणि मध्यवयीन रुग्ण अधिक असल्याचे दिसते.आतापर्यंत सापडलेले अधिक तर रुग्णांंमध्ये कोविड ची सर्वसाधारण लक्षणे दिसत नसल्याचे समोर आले आहे.

अशा प्रकारच्या व्यक्तींमध्ये असलेल्या कोरोना विषाणूची बाधा अनेकांना होऊ शकते. वैद्यकिय भाषेत हे रुग्ण कोविड कॅरियर ठरू शकतात. त्यामुळे यात अधिक धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारने हलक्या सर्दी खोकल्याच्या रुग्णांचीही कोविड तपासणी करण्यास सुरवात केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनी दिली.

निम्म्या चाचण्या मुंबईत : 
राज्यात आतापर्यंत झालेल्या 76 हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. एकूण झालेल्या चाचण्यांपैकी केवळ अडीच टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या शासकीय 21 आणि खासगी 15 चाचणी प्रयोगशाळा आहेत , त्या माध्यमातून ह्या चाचण्या करण्यात येत आहेत. राज्यात लवकरच आणखी 6 प्रयोगशाळांची भर पडणार असून ही संख्या 36 होईल.

asymptomatic covid patients is almost seventy percent in maharashtra says health department  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.