मुंबई - मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांबीच्या अटल सेतूवरुन गेल्या सात महिन्यांत ५० लाखांहून अधिक गाड्या धावल्या आहेत. मुंबई मेट्रोपोलिटियन रिजन डेव्हलपमेंट अथोरिटी (एमएमआरडीए) च्या निवेदनातील माहितीनुसार जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान पुलावरून ५० लाख चार हजार ३५० गाड्या धावल्या. बेस्ट, एनएमएमटी आणि एसटीच्या शिवनेरी गाड्याही आहेत.