Atal Setu : "देशात 'मोदी राज' आलं म्हणून अटल सेतू होऊ शकला"; फडणवीसांनी कथन केल्या प्रकल्पामागच्या अडचणी

शिवडी ते न्हावा-शेवा या अटल सेतू - मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवारी पार पडलं.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

मुंबई : शिवडी ते न्हावा-शेवा या अटल सेतू - मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवारी पार पडलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार मांडले. तसेच देशात मोदी राज आलं म्हणून अटल सेतू होऊ शकला असं त्यांनी म्हटलं. (atal setu pm narendra modi innauturated and devendra fadnavis says while modi raj it is possible)

Devendra Fadnavis
Girl Marriage Age: हिमाचल सरकारचा ऐतिहासिक निर्णय! वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यावरच होणार मुलींची लग्न

आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस

फडणवीस म्हणाले, आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी स्वप्नपुर्तीचा दिवस आहे. मला या गोष्टीची सर्वात जास्त खुशी आहे की अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. याचं भूमिपुजन पंतप्रधानांनी केलं होतं आणि उद्घाटनंही त्यांच्याच हस्ते होत आहे. तसेच अटल सेतू यामुळं होऊ शकला कारण या देशात मोदी राज आलं. जर मोदी राज आलं नसतं तर अटल सेतू कधीही होऊ शकलं नसतं. (Marathi Tajya Batmya)

Devendra Fadnavis
Annapoorani Movie Row: 'अन्नपूर्णी'चा वाद मिटेना! झी स्टुडिओवर बंदी घालण्याची भाजप नेत्याची शाहांकडे मागणी

अटल सेतूची कल्पना ४० वर्षांपूर्वी मांडली

या अटल सेतूची संकल्पना १९७३ मध्ये मांडण्यात आली होती. १९८२ मध्ये जेआरडी टाटा यांच्या कमिटीनं याची मांडणी केली. पण ४० वर्षांपासून काहीही होऊ शकलं नाही. पण जेव्हा या देशात मोदीजी पंतप्रधान बनले त्यानंतर देशाचा मिजाज बदललं. कामाची पद्धती बदलली. त्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं. त्यानंतर गोष्टी वेगानं धाऊ लागल्या. त्यानंतर मोदींच्या सरकारनं वेळेत आम्हाला सर्व पर्यावरणीय क्लिअरन्स दिला. सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या गेल्या.  (Latest Maharashtra News)

Devendra Fadnavis
मोदी शंकराचार्यांपेक्षा मोठे आहेत का? भाजपचे ढोंगी हिंदू प्रेम उघड झाल्याची काँग्रेसची टीका

फ्लेमिंगोचं अभयारण्य सुरक्षित

काही लोक म्हणायचे की इथं फ्लेंमिंगोचं अभयारण्य आहे. त्यानंतर आम्ही बीएनएचएसच्या माध्यमातून याचे कायदेशीर गोष्टी पाहिल्या. त्यानंतर आम्ही पाहिलं की, फ्लेमिंगोंची संख्या उलट वाढले आहेत, कमी झालेली नाही. तसेच आमचा सेतू देखील तयार झाला. (Marathi Tajya Batmya)

Devendra Fadnavis
Budget 2024: मोठी बातमी! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार?

मोदींनी थेट एमएमआरडीएला कर्ज उपलब्ध करुन दिलं

एक आणखी आमच्यासमोर प्रश्न होता की त्यावेळी इतकं मोठं कर्ज आम्हाला जपानचं सरकार देत होतं जायका देत होतं. पण इतकं कर्ज जर आम्ही राज्यानं घेतलं असतं तर कदाचित आमच्या ग्रामीण भागात काम करण्याची ताकद कमी झाली असती. (Latest Marathi News)

आम्ही मोदींना विनंती केली की प्रथा तोडून तुम्ही आमच्या एमएमआरडीएल कर्ज मिळवून द्या. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशात पहिल्यांदाच कॅबिनेटचा निर्णय करुन थेट एमएमआरडीएला कर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यामुळं आमच्या एमटीएचएलचं काम पूर्ण होऊ शकलं. हा सेतू एक इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.