Mumbai Crime News : घाटकोपरमधून बांग्लादेशी अटकेत; एटीसीची कारवाई

आरोपीला एका व्यक्तीने मदत केल्याचे पोलीस चौकशीतून समोर
ATC Action Bangladesh person arrested Terrorism mumbai crime
ATC Action Bangladesh person arrested Terrorism mumbai crimeesakal
Updated on

मुंबई : मुंबईतील घाटकोपरच्या भटवाडी परिसरात एका संशयित बांग्लादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. आलामीन ऊर्फ आलम मुजबीर शेख असे आरोपींचे नाव असून तो गेल्या सात वर्षांपासून अवैधरीत्या नवी मुंबईतील घणसोली येथे बेकायदेशिररित्या राहत असल्याची माहिती आहे. आरोपीला यासाठी एका व्यक्तीने मदत केल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.

सापळा रचून अटक

घाटकोपर येथील भटवाडी परिसरात एक संशयीत बांग्लादेशी नागरिक येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाला एटीसीला मिळाली होती. त्यानुसार घाटकोपर परिसरात एटीसीने सापळा रचला होता.

रविवारी 2 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एक व्यक्ती तेथे आली. पोलिसांच्या खबऱ्याने तीच व्यक्ती बांग्लादेशी नागरिक असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी व्यक्तीला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता व्यक्तीचे नाव आलामीन ऊर्फ आलम मुजबीर शेख असल्याचे कळले.तसेच तो घणसोली गाव येथे वास्तव्याला असल्याचे त्याने सांगितले.

बांगलादेशी असल्याचे उघड

आरोपीकडे भारतीय नागरिक असल्याचे पुरावे मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केल्यानंतर बांग्लादेशातील जामरील येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले.

त्याच्या अंगझडतीत मोबाईल संचासह त्याने घणसोली येथे मोहम्मद शेख नावाने जन्माचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्याची पावती पोलिसांना सापडली. भारतात राहण्यासाठी त्याला घणसोलीतील महमूद शेख नावाच्या व्यक्तीने मदत केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.