Mumbai Crime : बँकेत 2000 च्या बनावट नोटा बदलण्याचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

बँकेत नोटा बदलताना नोटा मोजणाऱ्या मशिनमध्ये बनावट नोटा आढळून आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांना संशय
Attempt to exchange counterfeit 2000 notes in bank accused arrested crime police mumbai
Attempt to exchange counterfeit 2000 notes in bank accused arrested crime police mumbai Sakal
Updated on

मुंबई : शुक्रवारी 26 मे रोजी मुंबईतील ताडदेव परिसरातील एका खासगी बँकेत 2000 रुपयांच्या 10 बनावट नोटा बदलून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नवीद अशफाक शेख असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. शेख हा मोबाईलच्या दुकानात कार्यरत आहे.

Attempt to exchange counterfeit 2000 notes in bank accused arrested crime police mumbai
2000 Rupess Note : 2 हजाराच्या नोटा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या माथी; शेतकऱ्यांची कोंडी!

बँकेत नोटा बदलताना नोटा मोजणाऱ्या मशिनमध्ये बनावट नोटा आढळून आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी नोटांबद्दल आरोपीला माहिती विचारली असता तो समधनकरक उत्तर न देऊ शकल्याने त्याला बँक कर्मचाऱ्यांनी पकडले. 19मे रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्भूमीवर ही घटना समोर आली आहे.

Attempt to exchange counterfeit 2000 notes in bank accused arrested crime police mumbai
Nashik Crime News : 4 लाखांचे सोन्याचे दागिने बसस्थानकातून लंपास

शुक्रवारी 26 मे रोजी दुपारी ताडदेव येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत नवीन शेखने 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेण्यासाठी जमा केल्या होत्या. शेख यांनी नोटा बदलताना माहिती देणारा फॉर्म भरला होता तसेच आधार कार्डची प्रतही सादर केली होती. संशयाचे कारण म्हणजे नोटा मोजण्याचे मशीन नोटा स्वीकारत नसल्यामुळे हा पूर्ण घोटाळा उघडकीस आला.

बँक अधिकाऱ्यांकडून ताडदेव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. ताडदेव पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे . याप्रकरणी ताडदेव पोलीस अशाच प्रकारे आरोपीने किती बँकांची फसवणूक केली आहे का या संदर्भात तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.