मुंबई रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. एका महिलेसोबत खुलेआम विनयभंग केल्याची घटना समोर आली.
मुंबई - मुंबई रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. ताजे प्रकरण गोरेगाव रेल्वे स्थानकाचे आहे. येथे एका महिलेसोबत खुलेआम विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक करून कारवाई सुरू केली आहे.
महिलेचे चुंबन घेण्याचा प्रयत्न
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय तरुण आरोपीने 5 ऑक्टोबर रोजी गोरेगांव रेल्वे स्टेशनवर महिलेचा विनयभंग तर केलाच, शिवाय पीडितेचे बळजबरीने चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने पीडित महिलाही घाबरली आणि आरडाओरडा करू लागली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी पीडित महिलेची सुटका केली आणि आरोपीला पकडून प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या जीआरपी कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
न्यायालयाकडूनपोलीस कोठडी
बोरिवली रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसांची बोरिवली जीआरपी कोठडी सुनावली आहे.
विनयभंगाच्या प्रकरणात वाढ
महिलांशी गेल्या काही काळात घडलेली विनयभंगाची ही पहिलीच घटना नसली तरी याआधीही मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या विनयभंगाच्या घटना समोर येत आहेत. नुकतेच जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात एकट्याने प्रवास करणाऱ्या 25 वर्षीय महिला वकिलासोबत विनयभंगाची घटना उघडकीस आली. आरोपी अंधेरी स्थानकातून महिलांसाठी राखीव असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात चढले होते. यादरम्यान आरोपीने पीडितेशी विनयभंग केला. पीडितेनेही तिची व्यथा ट्विटरवर शेअर केली आहे. त्यानंतर जीआरपीने कारवाई करत चार पथके तयार केली आणि 43 वर्षीय आरोपी बिहारीलाल यादवला महालक्ष्मी परिसरातून अटक केली. आरोपीवर यापूर्वीही गुन्हे नोंद आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.