मुंबई : मुंबईतील लासा सुपरजेनेरिक्स व इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) यांनी कोविड- 19 विषाणूला निष्प्रभ करण्याच्या औषधातील "फेव्हीपिरवीर' हा घटक विकसित करण्यास सुरुवात केली आहे.
लासा सुपरजेनेरिक्सचे अध्यक्ष डॉ. ओंकार हेर्लेकर यांनी नुकतीच ही माहिती दिली.
कोविड- 19 विषाणू निष्प्रभ करण्यात "फेव्हीपिरवीर' हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. हा घटक विकसित करून त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. हे उत्पादन लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांची परवानगी मिळवण्यात येईल. त्याआधी जागतिक औषध नियंत्रकाकडून मान्यता मिळवली जाईल. त्यानंतर त्याच्या चाचण्या करण्यात येतील. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर या घटकाचे व्यापारी उत्पादन करण्यासाठी सरकारी मदत किंवा खासगी गुंतवणुकीचे मार्ग अवलंबले जातील, असे त्यांनी सांगितले.
आयसीटीचे प्रा. विकास तेरलवेकर यांनी या प्रयत्नांचे स्वागत केले असून, या घातक विषाणूचा नायनाट करण्यासाठी नवे औषध उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. एबोला, चिकुनगुन्या आदी अन्य घातक आजारांवरील औषधांतही हा घटक असतो.
Attempts to develop a drug on the corona
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.