August Kranti Din: ऑगस्ट क्रांतीदिनी महात्मा गांधींचे पणतू पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत देखील भडकले

August Kranti Din
August Kranti Din
Updated on

August Kranti Din :  महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मला सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. कारण मी ९ ऑगस्ट भारत छोडो दिनाच्या स्मरणार्थ घरातून निघालो होतो. मला अभिमान आहे माझे आजोबा बापू आणि बा (आजी) यांनाही ऐतिहासिक तारखेला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली होती, असे तुषार गांधी म्हणाले. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारला सवाल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, "ज्या गांधींनी 'चले जाव' ची घोषणा केली. भारत छोडो गर्जना केली. त्या गांधींचे पणतू तुषार गांधी यांना रोखले जात असेल तर यांचा सबंध काय. भारत छोडो, चले जाव चळवळीला संघ परिवाराचा विरोध होता. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ब्रिटिश सरकारला काय पत्र लिहिले ते रेकॉर्डवर आहे." (latest marathi news)

चले जाव चे आंदोलन चिरडून टाकले पाहिजे, भारत छोडोला आमचा विरोध आहे. या आंदोलनाला ब्रिटीश सरकारने महत्व देऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. ते आज ऑगस्ट क्रांतीदिनी पुष्पचक्र वाहत  आहेत, हा सर्वात मोठा विनोद आहे, असे राऊत म्हणाले.  

August Kranti Din
Gautam Adani: ...यामुळे गौतम अदानी Adani Wilmar मधील 44% टक्के हिस्सा विकण्याच्या तयारीत

तुषार गांधी पोलिसांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. ट्विटरवर युजरला उत्तर देताना तुषारने सांगितले की ऑगस्ट क्रांती मैदानावर शांततापूर्ण मोर्चाची तयारी होती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान म्हणून याकडे पाहिले जात आहे. तुषार गांधी यांना त्याच्या समर्थकांसह ताब्यात घेण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेतही तुषार गांधी दिसले होते. तुषारचे पूर्ण नाव तुषार अरुण गांधी आहे. त्यांचे वडील पत्रकार अरुण मणिलाल गांधी होते. गांधीजींचे पुत्र मणिलाल गांधी यांचे ते नातू आहेत. त्यांनी गुजरातमधील वडोदरा येथे महात्मा गांधी फाउंडेशनची स्थापना केली आहे. ते आपल्या कुटुंबासह मुंबईत राहतात.

August Kranti Din
Uddhav Thackeray: ठाकरे गटात पुन्हा मोठा बंड होणार? संभाजीनगरमध्ये पार पडली गुप्त बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.