Jinnah Fans Club: 'औरंगजेब फॅन्स क्लब' विरुद्ध 'जिना फॅन्स क्लब'; भाजपच्या टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर

पुण्यात रविवारी भाजपचं अधिवेशन पार पडलं, यावेळी ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर संजय राऊत यांनी थेट हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut attack on Narendra Modi Amit Shah
Sanjay Raut attack on Narendra Modi Amit Shahesakal
Updated on

मुंबई : पुण्यात भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांनी ठाकरेंना औरंगजेब फॅन्स क्लबचे प्रमुख असं संबोधलं होतं. त्यांच्या या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना आम्ही पंतप्रधान मोदींचा संदर्भ देताना 'जिना फॅन्स क्लब'चे सदस्य नाहीत अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Raut attack on Narendra Modi Amit Shah
Budget Session 2024: 2047च्या 'विकसित भारत'साठी उद्याचं बजेट महत्वाचं; PM मोदींनी दिले मोठे संकेत

संजय राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या संदर्भात 'औरंगजेब फॅन्स क्लब' असं वारंवार अमित शहा बरळत आहेत. पण आम्ही 'जिना फॅन्स क्लब'मध्ये सामिल नाही. पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनाच्या कबरीवर फुलं उधळणारे आम्ही नाहीत. पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांचा केक कापण्यात आणि खाण्यात आम्हाला कधीही इंटरेस्ट नव्हता. या देशातील प्रखर राष्ट्रवादी मुसलमानांची बाजू मांडणं यात काही चुकीचं नाही. या देशातील अनेक संघर्षाच्या काळात मुस्लिमांनी देखील बलिदान केलं आहे"

Sanjay Raut attack on Narendra Modi Amit Shah
Assembly Elections 2024 : ‘महाविकास’चा प्रत्येकी 5 जागांचा ‘फॉर्म्युला’; विधानसभा निवडणूक तयारी

पण महाराष्ट्रातील पराभव अमित शहांच्या जिव्हारी लागला आहे. महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात देखील त्यांनी शरद पवारांवर आरोप केले. तसंच उद्धव ठाकरेंना 'औरंगजेब फॅन्स क्लब'चे प्रमुख असं म्हटलं, पण तरीही इथल्या जनतेनं त्यांचा दारुण पराभव केला. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निमित्त अमित शाहांना राज्यातील जनतेनं दिला आहे, त्याचा आक्रोश ते आत्ता करत आहेत.

Sanjay Raut attack on Narendra Modi Amit Shah
Kolhapur Rain Update : पंचगंगा धोका पातळीकडे; कोल्हापूर जिल्ह्याच्‍या सर्व भागांत संततधार; वाहतूक ठप्प

शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन व्यक्ती महाराष्ट्रातील आणि देशातील सन्माननिय व्यक्ती आहेत. भाजपसारख्या ईव्हीएम, इलेक्टोरल बॉण्ड, ईडी आणि सीबीआयचे घोटाळे करुन आम्ही जिंकत नाही. जनतेनं आम्हाला स्पष्ट मार्गानं विजयी केलं आहे, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com