मुंबईः मुंबईत एका मराठी लेखिकेनं ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्यानं या लेखिकेनं हे आंदोलन करत आहे. शोभा रजनीकांत देशपांडे असं या लेखिकेचं नाव आहे. मराठीत बोलण्याची मागणी केल्यानंतर दुकानदारानं अपमान केला. त्यानंतर लेखिका शोभा या गुरुवारी दुपारपासून या ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाहेर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत आहेत.
हे ज्वेलर्सचं दुकानं कुलाब्यात आहे. शोभा या सुद्धा कुलाब्यामध्ये राहतात. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू असं कुलाब्यासारख्या ससून डॉक भागात हे ज्वेलर्सचं दुकान आहे. महावीर ज्वेलर्स असं या दुकानाचं नाव असून या ज्वेलर्सच्या दुकानादारानं मराठीत बोलण्यास नकार दिला. त्यानंतर त्यानं अरेरावी देखील केली आणि दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई करत पोलिसांना बोलवूव अपमानित केलं. यामुळेच शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेरच ठिय्या मांडला आहे.
गुरुवारी दुपारी शोभा देशपांडे या महावीर ज्वेलर्समध्ये गेल्या होत्या. त्यावेळी दुकानदारानं त्यांच्याशी हिंदीत संवाद साधण्यास सुरुवात केली. मात्र त्यांनी त्यांना मराठीत बोला अशी विनंती केली. पण दुकानदारानं मराठीत बोलण्यास नकार देत दागिनं देण्यासही नकार दिला. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्यांना दुकानाच्या बाहेर काढलं. दुकानदार आणि पोलिसांनी दुकानाबाहेर काढल्यामुळे गुरुवारी पाच वाजल्यापासून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
पोलिसांकडूनही अपमान झाला असल्यानं मुंबई पोलिस आयुक्त स्वतः जोपर्यत येत नाही. त्या सराफ आणि पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत तिथेच ठिय्या देऊन झोपून राहणार असल्याचा पवित्रा लेखिकेनं घेतला आहे.
शोभा रजनीकांत देशपांडे या एक लेखिका आहेत. त्यांचं मराठी भाषेवर अतोनात प्रेम आहे. त्या नेहमी मराठीचा आग्रह धरत असतात. म्हणूनच महावीर ज्वेलर्स दुकानाचे गुजराती असलेल्या मालकासोबत त्यांचे खटके उडाले.
Author shobha deshpande protests on street against Mahavir Jewelers denies speak Marathi
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.