नवी मुंबई : ऑटो रिक्षा (Auto rickshaw) चोरी (Theft) करणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने ऐरोलीतुन (Airoli) अटक केली आहे. ओमकार दिलीप वरवटकर (Omkar Dilip Varvatkar) (२८) असे या चोरटयाचे नाव असून त्याने रबाळे (Rabale) व पवई (Pawai) पोलीस ठाण्याच्या (Police Station) हद्दीत दोन रिक्षा चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने त्याच्याकडून दोन ऑटो रिक्षा हस्तगत केल्या आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऑटो रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांना दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एम.तडवी, हर्षल कदम व त्यांच्या पथकाने रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रिक्षा चोरी प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला होता. या तपासात गुन्हे शाखेने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एक संशयीत व्यक्ती रिक्षा चोरी करताना निदर्शनास आला.
सदर व्यक्तीची गुन्हे शाखेने माहिती काढली असता, तो रेकॉर्डवरील आरोपी ओमकार वरवटकर असल्याचे आढळुन आले. तसेच सध्या तो पवई येथे रहाण्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेकडून त्याचा शोध सुरु असताना, तो पुर्वी राहत असलेल्या ठिकाणी ऐरोली सेक्टर-४ मध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला सापळा लाऊन अटक केली. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याची चौकशी केली असता, त्याने रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून चोरीच्या दोन रिक्षा हस्तगत करुन त्याला अटक केली. या आरोपीवर रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल असल्याची देखील तपासात आढळुन आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.