Coronavirus : ऑक्सिजन देणाऱ्या रोपांच्या मागणीत वाढ

नासाने काही रोपांचा समावेश ऑक्सिजन वाढवणारी म्हणून केला आहे.
Tree Planting
Tree PlantingSakal
Updated on

मुंबई : कोविड काळात शुद्ध ऑक्सिजनची (oxygen) निकड प्रकर्षाने समोर आल्याने ऑक्सिजन देणाऱ्या 'इन डोअर' रोपांची मागणी वाढली आहे. घरातल्या घरात कुंडीत रुजतील अशा प्रकारची मध्यम आकाराची रोपे (yard plants) लावण्याचा नवा ट्रेंड सध्या सुरू झाला आहे. तुळस, कडुलिंब, कोरफड, कृष्णकमळ आणि घरासमोरील कुंड्यामध्ये ठेवलेल्या काही झाडे लावण्याचा ट्रेंड आपल्याकडे आधीपासूनच आहे. (awareness oxygen corona effect consumption yard plants)

"आपल्या संस्कृतीत अनादी काळापासून झाडांना महत्व आहे. वड, पिंपळ, कडुलिंब आणि औदुंबर मध्येही औषधी गुणधर्म आहेत. यामुळे देखील मोठ्या प्रमाणात हवा शुद्ध होते तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढते", असे वनस्पती तज्ज्ञ मिलिंद राऊत यांनी सांगितले.

Tree Planting
तिसरी लाट मुलांसाठी घातक; कोरोना काळात घ्या 'ही' काळजी

पुढे ते म्हणतात,''नासाने काही रोपांचा समावेश ऑक्सिजन वाढवणारी म्हणून केला आहे. मात्र पाश्चात्य देशातील वातावरण आणि आपल्याकडील वातावरण यात खूप फरक आहे. त्यामुळे तेथील झाडांचा आपल्याकडे फारसा उपयोग होईल, असे वाटत नाही. अ‍ॅलोवेरा, कृष्णकमळ, अ‍ॅरिका पॉम यांच्यासह कुंड्यात वाढणारे मनी प्लॅन्ट, साप घरात येऊ नये म्हणून लावले जाणारे स्रेक प्लॅन्ट, रबर प्लॅन्ट, जरबेरा, स्पायडर प्लॅन्ट, लॅव्हेंडर, कुंडीतील बांबू प्लॅन्ट, पीस लिली, ड्रासेना, आर्किड, जास्मीन आदी रोपे कुंडीत लावली जातात. मात्र, यांच्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते की नाही हे आज तरी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नसल्याचेही राऊत म्हणाले मात्र यामुळे घरातील वाटवरण ताजेतवाने, सकारात्मक होण्यास मदत नक्कीच होते", असे राऊत म्हणाले.

'नासा' सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेने सेन्सेव्हेरिया (स्नेक प्लांट), (अरेका) पाम, स्पायडर प्लांट, मनी प्लांट, झेड झेड (झामिया) प्लांट, पीस लिली, रबर प्लांट, बांबू पाम ही आठ झाडांचा उल्लेख ऑक्सिजन देणारी झाडे म्हणून केला आहे. अनेक वृक्षप्रेमींनी इंटरनेटवरून ही माहिती उपलब्ध होते. त्यानंतर ते वेगवेगळया नर्सरीमध्ये संपर्क करून या झाडांबाबत माहिती घेतात. ही रोपे विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढल्याचं सोनाली कुंभार यांनी सांगितले.

"कोविड काळात मात्र घरातील हवा शुद्ध करणारी तसेच अधिक ऑक्सिजन देणारे झाडे लावण्याकडे लोकांचा कल वाढला आहे", असं ठाण्यातील फॉरेस्ट लाईव्ह, इनडोअर प्लांट नर्सरीच्या सोनाली पंकज कुंभार यांनी सांगितलं.

"कोविड काळापासून 'इन डोअर' लागवड शक्य असणाऱ्या रोपांची मागणी वाढली आहे. दिवसाला 100 ते 125 रोपांची विक्री होते", असे 'सुख शांती नर्सरी'चे प्रमुख दीपेन नागडा यांनी सांगितले. यातही बरीच रोप ही सुर्यप्रकाशाशिवाय उगवत असल्याने घरामध्ये लावण्यास अधिक पसंती देण्यात येते. ही रोप अगदी 50 रुपयांपासून ते अगदी दीड हजार रुपयांपर्यंत विकत मिळतात,त्यामुळे रोपांना मागणी वाढली असल्याचेही दीपेन यांनी सांगितले.

"वर्क फ्रॉम होममुळे मी गेल्या वर्षभर घरातूनच काम करतो. घरात एसी,टीव्ही, फर्निचर यामुळे देखील अनेक विषारी घटक तयार होत असतात. अशात घरातील हवा शुद्ध राहणे महत्वाचे आहे. यासाठी मी गुगल वरून हवा शुद्ध करणाऱ्या रोपांची माहिती घेतली आणि ती रोपे घरात आणून लावली", असं मार्केटिंग कंपनीत काम करणाऱ्या पंकज दळवी याने सांगितले.

"कोविड काळात ऑक्सिजन देणाऱ्या आणि हवा शुद्ध करणाऱ्या रोपांची गरज होती. त्याची माहिती गुगल वरून मिळवली. त्यातील 25 रोपे घरात लावल्यानंतर घरातील वातावरण खूपच सकारात्मक आणि ताजेतवाने झाले", असं एका कंपनीत काम करणारे हितेश ढमढेरे यांनी सांगितले.

पिंपळच नाही तर असे अनेक वृक्ष आहेत जे रात्रीसुद्धा प्राणवायू बाहेर सोडतात किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक असते. तुळस, कडुलिंब, अ‍ॅलोवेरा, कृष्णकमळ आणि काही झाडांमध्येही हा गुणधर्म बघायला मिळतो.काही झाडांमध्ये अधिक क्षमता वातावरणातील विषारी वायू शोषणाचेही गुणधर्म आढळतात. पिंपळ वृक्ष रात्रीसुद्धा प्राणवायू सोडतो. पिंपळच नाही तर असे अनेक वृक्ष आहेत जे रात्रीसुद्धा प्राणवायू बाहेर सोडतात किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक असते, असे म्हटले जाते.

संपादन : शर्वरी जोशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()