Baba Siddiqe: सिद्दीकींच्या हत्येसाठी कोणाच्या खात्यांमध्ये आले 50-50 हजार रुपये? शूटर शिवकुमारच्या सोशल मीडिया पेजवर पोलिसांना नेमकं काय सापडलं?

Tragic Mystery Behind Baba Siddiqe's Death: येथील बहुतांश तरुण उपजीविकेसाठी मुंबईसह विविध शहरांमध्ये जातात, मात्र आता येथील लोकांचे नाव लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडले जात आहे.
Baba Siddiqe portrait - a victim of a shocking murder case
The Unfolding Story of Baba Siddiqe's Murder: What We Know So FarEsakal
Updated on

माजी मंत्री आणि अभिनेता सलमान खानचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनीआतापर्यंत उत्तर प्रदेशातीस बहराइचमधून दोन आरोपींना अटक केली आहे, तर एकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अशात काही दिवसांपूर्वी मुंबईहून बहराईचमधील गंडारा गावातील दोन-तीन लोकांच्या बँक खात्यात प्रत्येकी 50 हजार रुपये जमा झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हे पैसे मिळालेले सर्वजण फरार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मुंबई पोलीस आणि यूपी एसटीएफ या प्रकरणाचा तपास करत आहेत. याशिवाय धर्मराज आणि गौतमच्या काही मित्रांचीही चौकशी सुरू आहे.

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला शूटर शिवकुमार उर्फ ​​शिवा गौतम याचे सोशल मीडिया अकाउंट्स पोलिसांनी तपासली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौतमने स्वत:ला गुंड म्हणवून घेणारी पोस्ट केली आहे.

या प्रकरणी पोलीस इतर अनेक मुद्द्यांचा तपास करत आहेत. स्थानिक पोलीस येथे सुमारे सहा जणांची चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले. मुंबई पोलिसांसोबतच यूपी एसटीएफही बहराइचमध्ये तळ ठोकून आहे.

बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी धर्मराज आणि शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवाच्या 12 हून अधिक मित्रांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. मात्र, असे अनेक तरुण आहेत जे अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यांची चौकशी करणे आणि धर्मराज आणि शिव यांच्या कार्यशैलीची माहिती गोळा करणे हे मुंबई पोलिसांचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर अनेक तरुण संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे.

Baba Siddiqe portrait - a victim of a shocking murder case
Salman Khan: लॉरेन्स बिश्नोईला उलट धमकी देण्याचा सलमानला कुणी दिला सल्ला? बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ

बहराइचमधील कैसरगंज कोतवाली भागातील गंडारा गाव अचानक चर्चेत आले आहे. येथील बहुतांश तरुण उपजीविकेसाठी मुंबईसह देशातील विविध शहरांमध्ये जातात, मात्र आता येथील लोकांचे नाव लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडले जात आहे.

शनिवारी दसऱ्याच्या रात्री मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 3 हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्वीकारली असली तरी पोलीस या हत्येमागिल खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Baba Siddiqe portrait - a victim of a shocking murder case
Baba Siddique Shot Dead: तब्बल 10 वेळा झाले बाबा सिद्दीकींच्या हत्येचे प्रयत्न; पोलिसी खाक्या दाखवल्यावर आरोपींनी काय काय सांगितले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.