Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पकडलेल्या दोघांपैकी एक यूपी तर दुसरा हरियानाचा

NCP Leader Baba Siddique Shot Dead in Mumbai : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मुंबईत झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Baba Siddique
Baba Siddique
Updated on

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मुंबईत झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात त्यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सिद्दीकी जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी हे हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर परराज्यातील आरोपींनी गोळीबार केल्यामुळे बाबा सिद्दिकी यांना मारण्याची सुपारी दिल्याचा संशय पोलिसांना आहे.

बॉलिवुड अभिनेता सलमान खान हा बाबा सिद्दीकी यांचे जवळचे संबंध होते त्यामुळे अभिनेता सलमान खानला मदत केल्याप्रकरणी गोळीबार झाला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या भूमिकेचा पोलिसांकडून तपास केला जाणार असल्याचे सांगितेल जात आहे.

Baba Siddique
Who Is Baba Siddique : राष्ट्रवादीचे बाबा सिद्दीकी कोण होते? मुंबईत त्यांची गोळ्या घालून झाली हत्या

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अत्यंत दुर्देवी घटना आहे. तीन आरोपीपैकी दोन आरोपीना अटक झाली आहे. त्यातील एक उत्तरप्रदेश, दुसरा हरियाणाचा आहे. एक आरोपी फरार आहे. मुंबईत कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था हाती घेता कामा नये गँगवारने तोंड वर काढू नये, अशा मी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊ, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Baba Siddique
CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.