Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकींनी कसा मिटवला शाहरुख-सलमानमधील वाद, 'त्या' पार्टीत नेमकं काय घडलं होतं?

Story Behind Salman and Shahrukh reunion: करण अर्जुन, कुछ कुछ होता है, हम तुम्हारे है सनम यांसारख्या चित्रपटात ते एकत्र दिसले होते. त्यांची मैत्री खूप बहरली होती, ते बऱ्याच पार्टी आणि चित्रपट कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे.
Baba Siddique with Salman Khan and Shahrukh Khan at an iftar party, symbolizing their reunited friendship in Bollywood.
Baba Siddique celebrating the historic reunion of Salman Khan and Shahrukh Khan at his annual iftar party, marking a new chapter in their friendship.ESakal
Updated on

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री तीन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बाबा सिद्दीकी यांनी अनेक दशके काँग्रेमध्ये काम केल्यानंतर फेब्रुवारीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी सध्या वांद्रे पूर्वेतून काँग्रेसचे आमदार आहेत.

कॅटरीनाच्या बर्थ डे पार्टीत काय झालं?

बॉलीवूडचे दोन सर्वात मोठे सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात खूप जवळचे नाते आणि मैत्री आहे ज्याने गेल्या काही वर्षांत अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यांची मैत्री 1990 च्या दशकात भारतीय चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आहे.

करण अर्जुन, कुछ कुछ होता है, हम तुम्हारे है सनम यांसारख्या चित्रपटात ते एकत्र दिसले होते. यादरम्यान, त्यांची मैत्री खूप बहरली होती आणि ते बऱ्याच पार्टी आणि चित्रपट कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे.

पण, 2008 मध्ये मुंबईत कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दोन्ही सुपरस्टार्समध्ये खटके उडाले होते.असे म्हटले जाते की, शाहरुख आणि सलमान यांच्यात त्यावेळी जोरदार वाद झाला आणि कतरिना व शाहरुखची पत्नी गौरी खान यांना दोघांमधील भांडण टाळण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. त्यांच्यात वाद कशामुळे झाला हे कळू शकले नाही आणि त्या घटनेपासून ते एकमेकांना भेटणे टाळत होते.

सलमान आणि शाहरुखमधील हे शीतयुद्ध 2013 पर्यंत चालले. पण 2013 मध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत शाहरुख आणि सलमानमधील वाद मिटला. तिथे शाहरुख आणि सलमानने एकमेकांचे अभिनंदन केले आणि एकमेकांना मिठी मारली. काही वेळातच, सलमान-शाहरुखच्या गळाभेटीची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामुळे त्यांचे चाहतेही भावूक झाले होते.

यानंतर सलमान-शाहरुख यांच्यात पुन्हा मैत्री निर्माण करण्याचे श्रेय बाबा सिद्दीकी यांना जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी पार्टीनंतर सलमान बिग बॉस सीझन 6 च्या शूटिंगसाठी गेला आणि दुसरीकडे शाहरुखने सलमानचे वडील सलीम खान यांच्यासोबत डिनर केले.

Baba Siddique with Salman Khan and Shahrukh Khan at an iftar party, symbolizing their reunited friendship in Bollywood.
Baba Siddique Political Career: बिहार जन्मभूमी तर मुंबई कर्मभूमी; राजकारणासह सिनेसृष्टीत बाबा सिद्दीकींनी कसा निर्माण केला दबदबा?

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री वांद्रे येथील निर्मल नगरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची जाहीर केली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केले आहे. यातील एक हरियानाचा तर एक उत्तर प्रदेशचा आहे.

Baba Siddique with Salman Khan and Shahrukh Khan at an iftar party, symbolizing their reunited friendship in Bollywood.
Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.