बाबा सिद्दीकींना संपवण्यासाठी २५ दिवसांचं प्लॅनिंग, पार्सलद्वारे पिस्तूल अन् ॲडव्हान्स पेमेंट; आरोपींची चौकशीत खळबळजनक माहिती!

Accused Received Advance Payment and Gun via Parcel : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास वेगाने सुरू असून, आरोपींनी चौकशीत केलेली कबुली आणि तपशीलामुळे या प्रकरणात मोठे धक्कादायक खुलासे झाले आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं उघड झाल्यामुळे पोलीस सलमानच्या अँगलने देखील तपास करत आहेत.
Advance payment made to the accused for Baba Siddique's assassination; pistol delivered via courier by arms dealer.
Advance payment made to the accused for Baba Siddique's assassination; pistol delivered via courier by arms dealer. esakal
Updated on

सिद्दीकींच्या हत्येसाठी आरोपींना ॲडव्हान्स पेमेंट करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की, शस्त्र विक्रेत्याने कुरियरद्वारे पिस्तूल सोपवलं होतं. हे पिस्तूल हल्ल्यादरम्यान वापरलं गेलं. या हल्ल्यासाठी बिश्नोई गँगचा कर्नेल सिंग हा या प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. कर्नेल सिंगला २०१९ मध्ये हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, आणि जेलमध्ये असताना त्याने बिश्नोई गँगसोबत संपर्क साधला होता.

बाबा सिद्दीकींवर झालेल्या हल्ल्याची योजना-

कर्नेल सिंग आणि त्याच्या गँगने अनेक दिवसांपासून सिद्दीकी यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. सिद्दीकी यांची रेकी करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या सगळ्या कटात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं पुढे आलं आहे. आरोपींनी यासंबंधी चौकशीत सगळं उघड केलं आहे की, हे संपूर्ण काम अत्यंत योजनाबद्धरीत्या करण्यात आलं होतं.

२ सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. या खोलीसाठी महिन्याला १४ हजार भाडं देत होते. ४ जणांनी मिळून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गँगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले होते.

बाबा सिद्दीकींच्या अंत्यसंस्काराची तयारी

बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे संध्याकाळी ८:३० वाजता दफन केले जाणार आहे. मुस्लिम समाजाच्या परंपरेनुसार त्यांचा दफनविधी पार पडणार आहे. यापूर्वी त्यांचे पार्थिव बांद्र्यातील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, जिथे बॉलिवूडमधील नामवंत सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते येण्याची शक्यता आहे.

Advance payment made to the accused for Baba Siddique's assassination; pistol delivered via courier by arms dealer.
Baba Siddique Last Social Media Post: बाबा सिद्दीकी सोशल मीडियावर शेवटचे काय म्हणाले होते? काय होती शेवटची पोस्ट?

दफनविधी-

मुस्लिम धर्मानुसार, संध्याकाळी ७ वाजता नमाज-ए-जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना मकबा हाइट येथे होणार आहे. त्यानंतर रात्री ८:३० वाजता त्यांचा दफनविधी मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानमध्ये होणार आहे. या घटनेने मुंबईतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे, आणि अनेक नेतेमंडळी या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त करत आहेत.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास वेगाने सुरू असून, आरोपींनी चौकशीत केलेली कबुली आणि तपशीलामुळे या प्रकरणात मोठे धक्कादायक खुलासे झाले आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं उघड झाल्यामुळे पोलीस सलमानच्या अँगलने देखील तपास करत आहेत. सलमान खान पहिल्यापासून या गँगच्या रडारवर आहे. बाबा सिद्धीकी आणि सलमान खान आणि बॉलीवूडचशी जवळचे संबंध होते. 

Advance payment made to the accused for Baba Siddique's assassination; pistol delivered via courier by arms dealer.
Baba Sddique Shot Dead: 'तो' प्रकल्प ठरला कारणीभूत? बाबा सिद्दीकींना का संपवलं? हरियाना कनेक्शन समोर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.