MVA Press Conference: सरकारच्या प्रत्येक कृतीवर संशय, धोक्यात असलेल्या महाराष्ट्र वाचवायचा आहे, पत्रकार परिषदेतून मविआची टीका

Baba Siddiqui Case Update: आज मविआने पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
MVA
MVAEsakal
Updated on

Baba Siddiqui Murder Case: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. आता या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांडाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. या टोळीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ती व्हायरल झाली आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहे. आता या सगळ्या घटनेनंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी राज्य सरकारवर घेरलं आहे.

या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आरोपींवर अटक झाली असेल पण २ पोलीस आयुक्त आहेत ना.नाना पटोले यांचा फोन टॅप केला जात होतो. तिथे लक्ष नाही का ? महाराष्ट्र सुरक्षित आहे का ? गद्दारांना सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत. सरकारच्या प्रत्येक कृतीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. हे गंभीर आहे. तर विधानसभेबाबत ते म्हणाले की, आम्ही आमचं व्हिजन मांडणार आहोत. अडीच वर्षाच्या काळात आम्ही काम केलं आहे. मात्र जातीय दंगली करण्याचा त्यांच्याकडून शेवटचा प्रयत्न होत आहे, असं देखील ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपदासाठी मविआचा चेहरा कोण? असा प्रश्न वारंवार केला जात आहे. यावर आज उद्धव ठाकरेंनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदासाठी चेहरा हा आधी महायुतीने जाहीर करावा. आमच्याकडे अनेक चेहरे आहेत. त्यांचा जाहीर झाला की आम्ही करु. या वक्तव्याचे शरद पवारांनीही समर्थन केले आहे. तसेच उद्धव ठाकरेंची जी भूमिका तीच आमची भूमिका असे त्यांनी सांगितले.

MVA
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींची हत्या; सलमानशी मैत्री जीवावर बेतली? बिश्नोई गँगनं काटा काढला?

नाना पटोले यांनी सांगितले की, आम्ही एक आहोत. आमच्यात भांडण होणार नाही. महाराष्ट्र धोक्यात आहे. तो आम्हाला वाचवायचा आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हा विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही. त्यांच्यासाठी असेल. देवेंद्र फडणवीसांनी महामंडळ सुरू केली होती. त्यातील किती महामंडळे सुरू आहेत ? पोहरादेवी येथे झालेल्या राजकीय भाषणामुळे बंजारा समाजात राग आहे. शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण महाराष्ट्र खपवून घेणार नाही.

पत्रकार परिषेदत शरद पवार म्हणाले की, मी राज्यात फिरत आहे. जनता ही परिवर्तन करण्यासाठी उत्सुक आहे. ४८ पैकी ३१ जागा आम्ही जिंकू शकलो म्हणजे आताही होईल. बंजारा समाजासाठी कुठे त्यांना संधी दिली? सुधाकर नाईक हे मुख्यमंत्री होते. पंतप्रधान हे इंस्टीट्युट आहे. व्यक्तीने त्यांची गरीमा राखली पाहिजे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना तात्पुरती आहे की कायम स्वरुपात आहे? हा निवडणुकीपुरता केलेला उद्योग आहे, असं ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.