Baba Sddique Shot Dead: 'तो' प्रकल्प ठरला कारणीभूत? बाबा सिद्दीकींना का संपवलं? हरियाना कनेक्शन समोर...

Was the SRA Project Dispute the Motive Behind Baba Siddiqui’s Killing: बाबा सिद्दीकी यांना नुकतीच ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा मिळाली होती, परंतु तरीही त्यांची हत्या झाली, यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
Scene from Bandra where NCP leader Baba Siddiqui was shot, sparking widespread outrage and political debates
Scene from Bandra where NCP leader Baba Siddiqui was shot, sparking widespread outrage and political debatesesakal
Updated on

मुंबई, १२ ऑक्टोबर: मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची सरेआम हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार विजयादशमीच्या रात्री घडला, जेव्हा बाबा सिद्दीकी आपल्या मुलाच्या कार्यालयातून बाहेर पडत होते. या घटनेत तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुपारी किलिंगचा संशय व्यक्त केला आहे.

हत्येचे कारण काय?

मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील संत ज्ञानेश्वर नगर एस आर ए प्रकल्पात झिषान सिद्दिकी आणि बाबा सिद्दिकी यांचा विरोध होता. संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर हरियाणा येथील एका विशिष्ट समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर राहत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला केल्याच्या रागातूनच गोळीबार केला अशी चर्चा आता वांद्रे पूर्व परिसरात रंगली आहे.

आरोपींची ओळख

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून, तिसरा आरोपी फरार आहे. अटक केलेले आरोपी करनैल सिंह हा हरियाणातील आहे तर धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चार पथकांनी तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी राज्याबाहेर मोहीम राबवली आहे. या हत्येतील चौथा आरोपीही असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Scene from Bandra where NCP leader Baba Siddiqui was shot, sparking widespread outrage and political debates
Baba Siddique Political Career: बिहार जन्मभूमी तर मुंबई कर्मभूमी; राजकारणासह सिनेसृष्टीत बाबा सिद्दीकींनी कसा निर्माण केला दबदबा?

शिंदे सरकारवर टीका

बाबा सिद्दीकी यांना नुकतीच ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा मिळाली होती, परंतु तरीही त्यांची हत्या झाली, यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नचिन्हाखाली आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेनंतर त्वरित लीलावती रुग्णालयात भेट दिली, मात्र या हत्येने राज्यातील विरोधी पक्षांकडून शिंदे सरकारवर टीका सुरू झाली आहे.

Scene from Bandra where NCP leader Baba Siddiqui was shot, sparking widespread outrage and political debates
Baba Siddique: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा! मध्य रात्री सलमान, शिल्पा शेट्टी, संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.