Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशानसुद्धा टार्गेटवर; मुंबई पोलिसांकडे महत्त्वाचे इनपुट्स

Bishnoi Gang: बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला त्यावेळी दोघेही एकत्र होते. पिता-पुत्र एकत्र असतानाच आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दोघांना एकत्र मारायचे अन्यथा जो समोर दिसेल त्याला संपायचे, अशी सुपारी मिळाल्याचं चौकशीत समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.
Crime branch teams investigating Baba Siddiqui's murder, uncovering new leads linking the third suspect to Pune.
Crime branch teams investigating Baba Siddiqui's murder, uncovering new leads linking the third suspect to Pune.esakal
Updated on

Mumbai Police: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं असून आणखी तिघा जणांचा पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणात आणखी एक संशय पोलिसांना असल्याची माहिती येतेय.

बाबा सिद्दीकी यांच्यासह त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दिकी हा देखील मारेकऱ्यांच्या टार्गेटवर असल्याचा पोलिसांना संशय आहे. झिशानला देखील संपवण्याची सुपारी आरोपींना देण्यात आल्याचा संशय असल्याने पोलिसानी तपासाची सूत्रं फिरवली आहेत.

बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला त्यावेळी दोघेही एकत्र होते. पिता-पुत्र एकत्र असतानाच आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दोघांना एकत्र मारायचे अन्यथा जो समोर दिसेल त्याला संपायचे, अशी सुपारी मिळाल्याचं चौकशीत समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

Crime branch teams investigating Baba Siddiqui's murder, uncovering new leads linking the third suspect to Pune.
Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबबातची 'ती' पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकरच्या भावाला पुण्यातून अटक

दरम्यान, दरम्यान हत्येची घटना घडली त्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्यासोबत तीन कॉन्स्टेबल होते. पण ते काहीच करू शकले नाहीत. या गोळीबारात आणखी एक जण जखमी झाला आहे. आरोपींच्या चौकशीत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट हरियाणातील कतार तुरुंगात रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तिन्ही आरोपी हरियाणाच्या कतार तुरुंगात एकत्र होते. शिवकुमार असे फरार आरोपीचे नाव असून ते तिघेही 2 सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. गेल्या महिन्यात तिघेही जुहू बीचवर गेले होते. तेव्हा त्यांनी आठवण म्हणून त्यांचे फोटो काढले होते. त्या फोटोंमुळेच पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं सोपं गेलं. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.