बच्चू कडूंना दिलासा; सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
Bacchu Kadu
Bacchu Kaduesakal
Updated on

मुंबई : राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीनं कोठडी मिळालेल्या अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर कडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे. (Bacchu Kadu got relief Bail granted by Sessions Court)

Bacchu Kadu
'बल्क ड्रग पार्क'ही महाराष्ट्रातून गेला, मुख्यमंत्र्यांना माहितीए का? आदित्य ठाकरेंचा सवाल

जामीन मंजूर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, परीक्षेत उमेदवार मोबाईल वापरायचे. पेपरफुटीची प्रकरणं झाली होती. त्याविरोधात केलेल्या आंदोलनात संघर्ष झाला त्यातून माझ्यावर कलम ३५३ दाखल झालं. पण या प्रकरणी माझ्यावर गुन्हा कधी दाखल झाला समन्स कधी बजावलं हे देखील मला कळालं नाही आणि थेट कोठडी सुनावली. पण आता सेशन्स कोर्टानं मला जामीन मंजूर केल्यानं मी कोर्टाला धन्यवाद देतो.

मला मंत्रिपद मिळणारच - बच्चू कडू

फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणाबाबत मला पूर्ण माहिती नाही. पण हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही, असा मला आत्मविश्वास आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल अशी आशा आहे. शिंदे गटासाठी मी कडू वैगरे ठरलेलो नाही तर मी असा राहिलो असतो का? मंत्रिपद मिळणं हा आमचा अधिकार आहे आणि ते भेटल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मला वैयक्तीक, विधानसभेत आणि मीडियासमोर पण मला मंत्रिपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळं ते काही थांबणार असं नाही वाटतं. वेळ लागतोय तेवढं तर चालतं त्याशिवाय मजा येत नाही, अशा मिश्किल शब्दांत बच्चू कडू यांनी आपल्या मंत्रिपदाबाबत भाष्य केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()