मोबाईल अतिवापरामुळे पाठदुखीचे विकार

ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा लहान मुलांना फटका
Mobile
MobileSakal
Updated on

मुंबई : अभ्यासाला किंवा वर्गात बसण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तसेच दफ्तराच्या ओझ्यामुळे लहान मुलांना पाठदुखीचा त्रास होत होतो; परंतु लॉकडाऊनमध्ये दफ्तराचे ओझे कमी झाले असले, तरीही मोबाईल, कॉम्प्युटर तसेच लॅपटॉपच्या अतिवापरामुळे लहान मुलांना पाठदुखी, मानदुखी व मणक्याच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय क्षेत्रात केलेल्‍या एका सर्वेक्षणात घरून काम करणाऱ्या नागरिकांसोबतच आठ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये मानदुखी तसेच मणक्यांच्या आजारात वाढ झाल्याचे आढळले आहे.

Mobile
स्वच्छ सर्वेक्षणाची नवी मोहीम

याबाबत सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. अभय गायकवाड यांनी साांगितले की, गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. त्यामुळे शरीराची हालचाल ७० टक्के कमी झाली असून अनेकांना दिवसातले आठ ते १० तास कॉम्प्युटरवर काम करावे लागत आहे. तसेच, शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा ४ ते ५ तास मोबाईल अथवा लॅपटॉपवर ऑनलाईन शिक्षण घ्‍यावे लागत आहे. सतत सोफ्यावर, खुर्चीवर तसेच दिवसभर संगणकासमोर बसून काम केल्यामुळे लहान मुलांना मानदुखी व पाठदुखीचा त्रास वाढल्‍याच्‍या तक्रारींत वाढ झाली आहे.

Mobile
स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र

मुलांनी काय करावे?

अनेक तास स्क्रिनसमोर बसणे मुलांच्या शरीरासाठी घातक ठरू शकते. त्‍यामुळे डोळे, मान आणि स्नायूंवर अनावश्यक ताण पडतो. एका तासानंतर एक ब्रेक असायला हवा. या वेळेत मुलांनी घरी चालावे किंवा त्यांना छोटीशी कवायत करण्यास सांगावे. पाठीचा कडकपणा, थकवा व मानदुखी टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांच्या बसण्याच्या पद्धतीकडे पालकांनी लक्ष देणे आवश्‍‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.